एखाद्या नोकरदार स्त्रीला जेव्हा मातृत्वाची चाहूल लागते तेव्हा आनंदासोबत तिच्या मनात भविष्यात लागणार्या बाळंतपणासाठीच्या रजेचे, ऑफिसातल्या आपल्यावरील जबाबदाऱ्यांचे व आर्थिक जुळवाजुळवीचे विचारही येऊ लागतात. आपण काम करत असलेल्या कंपनीची प्रसूती रजेबाबत काय पॉलिसी आहे, कोणाकडून व्यवस्थित माहिती मिळेल, रजेसाठी काय करावे लागेल, कोणकोणत्या बाबींची पूर्तता केली की आपली प्रसूती रजा मंजूर होईल, त्या अंतर्गत आपल्याला कोणकोणत्या सवलती मिळतील... एक ना दोन गोष्टी असतात! तुम्ही सरकारी, निमसरकारी क्षेत्रात काम करता की खाजगी क्षेत्रात, यावरही बरेच काही अवलंबून असते.
आता बारावीचा निकाल अपेक्षित आहे.
जे यशस्वी होतील त्यांचे अभिनंदन. ज्यांन्ना प्राविण्य मिळाले त्यांचे मनापासून कौतुक.............
पण........
जे 'निकाल' ह्या संदर्भात ' नापास' म्हणून सुचवल्या गेले असतील त्यांचे त्यांन्नी परिक्षेसाठी मनापासून केलेल्या कष्टांसाठी मनःपूर्वक कौतुक!
'नापास' नुसते म्हणण्याने काही फरक पडत नाही. हे एक 'करेक्शन' आहे आपल्या आयुष्यातील पुढील प्रवासासाठी!
कारण....
थोडे ' निक वुइ-चि़क (Nick Vujicic) ह्या वल्लीचे 'द बटर फ्लाय' ही शाँर्ट फिल्म आवर्जून पहा मग पटेल मी काय म्हणतो ते!
हरवलेली कवितांची वही...
एकदा...दोनदा..तिनदा त्यानं डोअरबेल वाजवली,पण आतून
कसलीही चाहूल नाही..!तो वैतागला..''झोपली असेल
महाराणी,साडेसात वाजताच..तरी म्हणतं होतो,आईला चार-
आठ दिवस आणावं....पण सालं ह्या ऒफीसच्या कामानं
सगळा घोळ घातला..!!' असं मनातल्या मनात
पुटपुटत,तणतणत,आपला पुरुषी अहंकार थोडासा बाजुला ठेवत
त्यानं खांद्यावरच्या बॅगमधून त्याची चावी काढली व
दरवाजा उघडला.रागाने लाल झालेले डोळे तिचाच शोध घेत
होते..
लग्नाला अजून वर्ष झालेलं नव्हत..संसारात
तिखटमिठाची फोडणी ह्याच्या तापट स्वभावाने वारंवार
व्हायची..ती गरीब गाय होती..त्यात तिन
''नमस्कार श्रोतेहो..हे आकाशवाणीचे औरंगाबाद-
परभणी केन्द्र आहे.सकाळचे सहा वाजून दोन मिनिटे
आणि बारा सेकंद झालेले
आहे.आता ऎकुया मराठी भक्तीसंगित..''
माझ्या लहानपणीच्या अविस्मरणीय क्षणातील हा ऎक
क्षण..रेडिओने मला इतक्या काही सोनेरी गोष्टी बहाल
केल्याहेत की हे आजच आयुष्य त्याने कळत-नकळत
माझ्यावर केलेल्या संस्काराच फलित म्हटल्यास
अतिश्योक्ती नसावी..!!
रेडिओ माझ्या जन्माआधीच वडिलांच तिसरं अपत्य म्हणून
त्यांच्या गळ्यातील ताईत झाला होता..खरं तर
तो ट्रान्झिस्टर होता.फिलिप्स कंपनीचा नामांकीत सहा सेल
असणारा मर्फी रेडिओ.भला मोठा,त्याला चामड्याच,बेल्ट
''नमस्कार श्रोतेहो..हे आकाशवाणीचे औरंगाबाद-
परभणी केन्द्र आहे.सकाळचे सहा वाजून दोन मिनिटे
आणि बारा सेकंद झालेले
आहे.आता ऎकुया मराठी भक्तीसंगित..''
माझ्या लहानपणीच्या अविस्मरणीय क्षणातील हा ऎक
क्षण..रेडिओने मला इतक्या काही सोनेरी गोष्टी बहाल
केल्याहेत की हे आजच आयुष्य त्याने कळत-नकळत
माझ्यावर केलेल्या संस्काराच फलित म्हटल्यास
अतिश्योक्ती नसावी..!!
रेडिओ माझ्या जन्माआधीच वडिलांच तिसरं अपत्य म्हणून
त्यांच्या गळ्यातील ताईत झाला होता..खरं तर
तो ट्रान्झिस्टर होता.फिलिप्स कंपनीचा नामांकीत सहा सेल
असणारा मर्फी रेडिओ.भला मोठा,त्याला चामड्याच,बेल्ट
मार्च महीण्यातले रणरणते उनं..गावातला आठवडी बाजार गच्च फुललेला होता..लग्नसराईचे दिवस असल्यानं सगळ्याच दुकानवजा पालावर आजुबाजुच्या खेड्यावरील बाया,माणसे,मुला-मुलींची गर्दी मावत नव्हती..ज्या मुलींची लग्न ठरलेली होती त्या मैत्रिणीसोबत कटलरी-स्टेशनरी च्या दुकानावर 'नकपालीस',मेंदीकोण,पावडर,लाली,चमकी,बिंदी,'भारी'चे सेंट,हातरुमाल,छोटे आरसे घेतांना मध्येमध्येच वेड लागल्यागत खुदकन हसत होत्या..या सगळ्यामध्ये बिचार्या दुकानदाराची त्रेधातिरपिट उडत होती..
अर्थसंकल्पाच्या विश्लेषणापासून आपल्या करीयरची सुरुवात करून कालांतराने नाशिक परिसरातील सेक्स वर्कर्स, समलिंगी व तृतीयपंथींच्यात एचआयव्हीसंबंधी जागृती निर्माण करताना सेक्स वर्कर्सच्या पुनर्वसनासाठी व त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी झटणार्या आसावरी देशपांडेंचा प्रवास हा नेहमीच्या चौकटीपेक्षा वेगळा आणि जीवनाकडे नव्या दृष्टीने बघायला लावणारा आहे. त्यांचे काम जरी सेक्स वर्कर्स किंवा वारांगना, तृतीयपंथी लोकांच्यात एचआयव्ही जागृती संदर्भात असले तरी ह्या कामाचा संबंध संपूर्ण समाजाशी आहे.