आश्चर्य वाटले असेल ना? शीर्षक वाचून , अगदी बुचकाळ्यात देखील पडला असाल ना? आज-कालच्या कलीयुगात जो तो आपला आपला मतलब , आपला स्वार्थच पहाण्यात मशगूल असतो, जेथे माणसूकीची चाड देखील राहिलेली नाही अशाही काही किळसवाण्या घटनांनाही आपण सामोरे जातो तर मग ह्या जगात असे स्वत:च्या लाभाशिवाय कोणी तरी प्रेम करू शकेल का? साहजिकच उत्तर वाटते नाही , नाही , छे , छे हे तर केवळ अशक्यच आहे.
अविश्वासी ठराव,...
कुणी जोडला जाऊ शकतो
कुणी तोडला जाऊ शकतो
विश्वासावर विश्वास ठेऊन
अविश्वास घडला जाऊ शकतो
आकड्यांच्या संख्ये भोवती
साट्या-लोट्यांचा घेराव असतो
अन् विश्वासावर घाला घालुन
कधी अविश्वासी ठराव असतो
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
१७/०३/२०१५ दै. प्रजापत्र
ऐक स्वप्न पाहिले आपल्या सुखी संसाराचे..
ऐक स्वप्न पाहिले तुझ्यासोबत आयुष्यभर राहण्याचे..
ऐक स्वप्न पाहिले आई होण्याचे..
ऐक स्वप्न पाहिले आपल्या बाळाला मोठे होताना पाहायचे..
ऐक स्वप्न पाहिले आयुष्याची संध्याकाळ तुझ्या सोबत संपवण्याचे..
ऐक स्वप्न पाहिले तुझ्याआधिच
मला मरण येण्याचे..
कारण क्षणाचाही विरह नको आहे मला..
आणि ह्या ङोळयांनी अजुन ऐक स्वप्न पाहिले..
पुढच्या जन्मीही तुझीच साथ मिळण्याचे..
तुझीच जीवनसाथी होण्याचे......
तुझीच जीवनसाथी होण्याचे......
आणि
मनात ऐक आशा आहे तु माझे
कधी मनं खवळले जातात
कधी मनं कळवळू शकतात
कधी विरोध उफाळले जातात
कधी विरोध मावळू शकतात
परिस्थितीचा आढावा घेत
कधी शाब्दिक उधाण असावेत
तर बदलत्या परिस्थितीनुसार
कधी वाणीवर लगाम असावेत
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
१६/०३/२०१५ दै. प्रजापत्र
कॅल्शियम कोणकोणत्या अन्नपदार्थातून मिळते? फक्त दुध आणि दुग्धजन्य पदार्थातून मिळते का? जे दुधाचे पदार्थ खात नाहित त्यंच्यासाठी काय पर्याय आहेत?
काय करायचे अशा वेळेला?
एक महिना झाला मुलगा आजारी पडून. आता ९५% बरा आहे. पण ५% फारच त्रास देत आहेत.
अधूनम्धून खोकतो. सर्दीने इतका बेजार की चिडचिड करतो. रात्रीबेरात्री किंचाळत रडत बसतो. रात्री झोपतानासुद्धा आयपॅड बरोबर असण्याचा हट्ट करत बसतो. बरं आयपॅड दिला तर शांत होतो का? नाही तरीही रडत बसतो.
तुमचं समजूतीचे एकही वाक्य पोचतच नाही त्याच्यापर्यंत.
तो किती दूरच्या जगात आहे ह्याची जाणीव अशा वेळेस अगदी हमखास होते.
सर्दीने त्याचे डोके दुखत आहे का? ते त्याला सांगता येत नाही म्हणून चिडलाय का?
घरी खुप जुने कपडे जमा झाले आहेत. काय करावं कळत नाही. पुर्वी आई जुने कपडे बोहारणिला देऊन भांडी घेत असे. आता सोसायटीत बोहारणी येत नाहीत. कुठे येत असतील तर त्यांना गाठायला आम्ही दिवसभर नसतो. विनाकारण भांडी जमा करायची सुद्धा इच्छा नाही.
जुने कपडे डिस्पोज करण्यासाठी काय करता येईल? मला खालील पर्यांयांबद्दल माहिती/ मदत हवी आहे. मी मुंबईत राहते.
१. एखादी सेवाभावी संस्था जर कपडे स्विकारत असेल तर उत्तम. परंतु घरी येऊन न्यायला हवेत. तुमच्या ओळखी मध्ये अशी संस्था असल्यास सांगा.
२. रद्दी प्रमाणे जुने कपडे विकत घेणारी दुकाने असतात का? कृपया माहीत असल्यास सांगा.
माझ्या आजोबांचा लोकसंग्रह बर्यापैकी होता. ते गेले तेव्हा अनेक जण आजीला भेटायला येऊन गेले. काहींनी आजोबांच्या चांगल्या आठवणी सांगितल्या, काहींनी त्यांचे गुणवर्णन केले, तर काहींनी नुसत्या मौनानेच आम्ही तुमच्या दु:खात सामील आहोत हे सांगितले. जे प्रत्यक्ष येऊ शकले नाहीत त्यांनी पत्र पाठवून सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. आजोबा गेल्याचे दु:ख काही प्रमाणात का होईना अशा लोकांमुळे कमी व्हायला मदत झाली.
१ ले चर्चा सत्र :
विषयः मोदींना पर्याय काय, मोदींना पर्याय का नाही, मोदींना पर्याय निर्माण होणे आवश्यक आहे की नाही!
दिवसः ७ जानेवारी २०१५
१. मोदींसारख्या नेत्यांना पक्षांतर्गत व पक्षबाह्य असे दोन्ही ठिकाणी समर्थ पर्याय निर्माण होणे एका देशासाठी आवश्यक आहे.
२. काँग्रेसने तूर्त नवीन चेहर्यांचा विचार करावा व पक्षबांधणीवर फोकस ठेवावा. ज्योतिरादित्य शिंदे हे नांव दोन सदस्यांनी सुचवले.
नमस्कार, मला मायबोलीकरांकडून एक मदत हवी आहे. थोडीशी नाजूक बाब असली तरी योग्य व्यक्तींपर्यंत कसे पोहोचावे हे मला समजत नसल्यामुळे इथे मांडतेय. माझी अगदी जवळीची मैत्रिण मुंबईतील गतीमंद शाळेत गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षीका आहे. मुलांची मानसिकता ओळखणे, त्यांना शिकवणे, यामध्ये ती माहिर आहे. तिच्या शाळेमध्ये एका गतिमंद निवासी संस्थेतून दर महिन्याला काही या गतिमंद मुलांना विविध गोष्टी शिकवण्यासाठी पाठवले जाते. त्यातील काही म्हणजे नीटनेटके राहणे, कपडे बदलणे, स्वतःची स्वच्छता राखणे इत्यादी. हे शिकवत असताना त्या मुलांची इन जनरल शारिरीक चाचणीपण केली जाते.