तिने डोळे उघडले व ढगांच्या गडगडाटासारखी हसली. तोंडात दात नव्हते. तिघांचीही आता चांगलीच टरकली होती. नंदू आणि विनूने एकमेकांच्या हातावरची पकड आणखीनच घट्ट केली. सनीही एक पाऊल मागे आला. ते तिथून पळणार होते तितक्यात “माझे पाय उलटे आहेत का हे पाहायलाच आलात ना?” असे म्हणून म्हातारीने पांघरूण थोडं वर केलं तसे तिचे सुरकूतलेले अशक्त पाय दिसले. ते पाय सरळ होते उलटे नव्हते हे पाहून तिघांनीही निःश्वास सोडला.
ए विनू चल की लवकर. कवापासून थांबलोय!” सनीने पाचव्यांदा हाक दिली तसा विनू धावतच आला. “खरच जायचं का आपन? मला लय भ्या वाटतंय रे.” विनू घाबऱ्या नजरेने सनी आणि नंदूकडे पाहत म्हणाला. हे ऐकून सनी आणि नंदू मोठ्याने हसले. “तरी तुला म्हनत हुतो नको घ्यायला याला. लय भित्र हाय हे.” सनी नंदूकडे पाहून बोलला. आपल्याला “भित्रा” बोललेलं विनूला आवडलं नाही. तो आवेशात येऊन म्हणाला, “मला भित्रा म्हंता व्हय. मी कुनाच्या बापाला बी भीत नाय. चला….” असे म्हणून तो एखाद्या योध्याच्या आवेशात पुढे आला.
रावसाहेब वाड्यावर पोहोचले तेव्हा त्यांचं मन पश्चातापाने व्यापलं होतं. बाळूवर आपल्या मुलावर आपण किती अन्याय केले हा एकच विचार त्यांच्या मनात घोळत होता. वाड्यात येताच बाळूला शोधत पूर्ण वाडा त्यांनी पालथा घातला. शेवटी ते गोठ्यात गेले. तिथे बाळू गाईंना चारा देण्यात मग्न होता. बाळूला पाहताच रावसाहेबांनी त्याला आलिंगन दिले आणि ते लहान मुलासारखे रडू लागले. रडक्या घोगऱ्या आवाजात ते बोलत होते, “मला माफ कर बाळा, माफ कर!
त्या रात्री रावसाहेबांना झोपच लागली नाही. मनात बकुळाच्या आठवणींचा पूर आला होता. त्यांनी घड्याळात पाहिले. सकाळचे आठ वाजून गेले होते. बाळूदेखील गाढ झोपला होता. ती पेंटिंगमधली बाई त्याच्या स्वप्नात आली होती. ती बीछान्यावर पहुडली होती व बाळूकडे लडिवाळ हसत पाहत होती आणि बाळू एकेक पाऊल टाकत तिच्या जवळ जात होता. आता बाळू तिच्या अगदी जवळ आला होता इतक्यात त्याच्या पाठीत वेदना उसळली व पाठोपाठ रावसाहेबांचे तिखट शब्द त्याच्या कानावर आदळले. “भाsssssडया उठोतोस की हणू अजून एक लाथ पाठीत!” रावसाहेब कडाडले, तसा बाळू पाठ चोळतच उठला व थेट स्वयंपाकघरात गेला व पाचच मिनिटात हातात चहाचा कप घेऊन आला.
कोंबडा अरवला तसा वेडा बाळू खडबडून जागा झाला. त्याने घाईगडबडीत सदरा अंगावर चढवला, खालची सतरंजी गुंडाळली व तो धावतच स्वयंपाकघरात गेला. त्याने गॅसवर दुधाचं पातेलं ठेवलं व एका बाजूला चहा बनवण्यासाठी एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवलं. चहा तयार होताच त्याने तो कपात ओतला व कप घेऊन तो थेट व्हरांड्यात आला. पण रावसाहेब तिथे नव्हते. इतक्या वर्षात असं पहिल्यांदाच घडत होतं. बाळू अंगणात गेला पण तिथेही रावसाहेब दिसत नव्हते. बाळू पुन्हा वाड्यात आला. तो थेट रावसाहेबांच्या खोलीपाशी आला. आतून घोरायचा आवाज येत होता. बाळूने हळूच खोलीचा दरवाजा सरकवला. आत बेडवर रावसाहेब गाढ झोपले होते.
" हे घे, माझ्या शरीरातून बाहेर पडणारं उष्ण रक्त तुझी तहान भागवायला पुरेसं असेल, तर हे घे..." हाशिम आपल्या हातावर धारदार सुरीच्या पात्याने जखमा करत ओरडला. त्या भयाण स्मशानात आजूबाजूला काहीही दिसत नसलं, तरी अदृश्य रूपात का होईना, ते रक्तसंमंध आहे आणि त्याची तहान मनुष्याच्या रक्ताशिवाय कशानेच भागात नाही हे त्याला माहित होत. प्रत्येक अमावास्येच्या रात्री तो असाच गावाबाहेरच्या त्या कब्रिस्तानात यायचा. इथे लोक दिवसासुद्धा पाऊल ठेवायला घाबरायचे. कोणी गावात गेलं तरच गावातली इतर मंडळी इथे यायची. लहान मुलं, स्त्रिया आणि जनावरांना तर इथे आणायला सक्त मनाई होती.
अब्दुल झपझप पावलं टाकत वाळू तुडवत आपल्या गावाकडे चालला होता. गाव बरच लांब होतं. ज्या रस्त्याने आपण गावाकडे चाललोय, त्या रस्त्यावर गाव यायच्या आधी कब्रिस्तान आहे आणि त्या कब्रिस्तानाच्या बाजूने जाणाऱ्या कोणत्याही जिवंत माणसाला सूर्यास्तानंतर कब्रिस्तानातले सैतान पकडतात आणि आपली रक्ताची तहान भागवून कब्रिस्तानबाहेर फेकून देतात अशी त्याच्या गावात अनेक वर्षांपासून लोकांना ऐकिवात असलेली दंतकथा त्याच्या मनात रेंगाळत होती. गावापासून चाळीस मैलांवर असलेल्या बाजारात तो आपला माल विकायला पहाटेच गेला होता.
सुरा हे वाळवंटातल्या गोड्या पाण्याच्या झऱ्याकाठी ऐसपैस पहुडलेलं एक सुखवस्तू गाव होतं. गावात मोजकेच लोक असले, तरी ते सगळे गुण्यागोविंदाने राहात होते. गावात कोणीही एकमेकांशी भांडण करणं, मारामार्या करणं असले प्रकार करत नसत. दार आठवड्याला शुक्रवारी जिरगा ( पंचायत ) जमवून सगळ्या तक्रारींचा निवाडा व्हायचा आणि दोन्ही बाजू ऐकून मौलवी, पंच आणि गावातले ज्येष्ठ हे सगळं कामकाज चालवायचे.
अब्दुल्ला आणि त्याची बायको एका छोट्याशा पडक्या घरात कसेबसे दिवस कंठत होते। घरात दोन वेळच्या खायची पंचाईत होती। दिवसभर गावात राब राब राबून ते शेवटी जे मिळेल ते एकत्र करून कसंबसं पोट भरायचे। मुलं नसल्यामुळे अक्खा गाव ' वांझोटी' म्हणत असलं, तरी अब्दुल्लाचं त्याच्या बायकोवर प्रचंड प्रेम होतं। गावात श्रीमंत लोक भरपूर होते आणि त्यांच्याकडे कामं करायला त्यांनी लांबवरून कोणाकोणाला गुलाम म्हणून विकत आणलं होतं। अब्दुल्ला अशाच एका गुलामांच्या तांड्यासोबत गावात आलेला होता आणि त्याला इतर गुलामांबरोबर गावाच्या वेशीबाहेर खास त्यांच्यासाठी तयार केलेल्या तोडक्यामोडक्या घरांपैकी एका घरात जागा मिळाली होती। त्
पहाटे पहाटे करीम बाजल्यावरून उठला। घराच्या आत झोपण्यापेक्षा त्याला घरच्या गच्चीवर मोकळ्या हवेत झोपायला आवडायचं. सूर्याच्या पहिल्या किरणांनी वाळूवर रेघा मारायला सुरुवात केली कि त्याला आपसूक जाग यायची. त्यानंतर तो थोडा वेळ गच्चीवरच हात-पाय पसरून शरीराचे स्नायू मोकळे करून घ्यायचा. गच्चीवरून खाली उतरून त्याने हात-तोंड धुतलं आणि चबुतऱ्यावर बैठक मारली. सवयीप्रमाणे त्याने डोक्याला मुंडासं बांधलं आणि अंगावर बंडी चढवली. कमरेची लुंगी त्याने बदलली आणि शेवटी अंगावर गुढघ्याच्या जरा खाली जाणारा अंगरखा घातला.