येत जा देऊन थोडी कल्पना
त्रास तुझा इथे सार्या जना...
आग लावणे काम हे तुझे असे
बाफ पेटती इथे विना-कारणा...
नांव दुजे घेऊनी संचारसी
त्रस्त करणे हीच तुझी कामना...
बंड झाले, उपाय थकले या क्षणी
कोण करी आता तुझा सामना...
दुर्लक्ष जरी शस्त्र असे 'लाजो' म्हणे
तरिही मुश्किल 'दु'सदस्या रोकना :फिदी:....
म्हणुन...
येत जा देऊन थोडी कल्पना
आगबंब आणण्याची करू योजना.....
प्रमाण पत्रकं - Conversion Tables
२ कप म्हणजे किती ग्रॅम्स?
१ स्टिक बटर म्हणजे किती कप?
असे प्रश्न इथे बरेच वेळेला विचारले जातात. काल एका बेकिंग पुस्तकात मला ही Conversion Tables सापडली. सगळ्यांनाच त्याचा फायदा होइल असे वाटले म्हणुन इथे देत आहे.
हॅप्पी कुकिंग
१. ओव्हन तापमान:
२. द्रव पदार्थ:
३. बटर प्रमाणः
कालपर्यंत होते तुझे माझ्यावर प्रेम
आवडायचे आपल्याला सगळे सेम टु सेम....
.
पण असं वाटतय आता विस्कटतोय आपला गेम
तुझ्या वागण्याचा हल्ली लागत नाहिये नेम...
.
महत्वाचं आहे का हे दिखावा आणि फेम
आपल्या जवळ असताना दोन अनमोल जेम...
.
संभाळत्येय मी तुला कशीबशी जेमतेम
सहन करता करता डोळ्यात पाणी केम...
.
वाटलं होतं थांबु जरा, सगळं होइल क्षेम
पण कारण दिलीस तु मला ती सगळी होती लेम....
.
मलाच वाटत्येय आता माझ्या हट्टावर शेम
माहित असुन सुद्धा की तुला मुश्किल करणं टेम...
.
आता मिच केलाय निश्चय, मिच बदलत्येय एम
मारून तुला डिच..........
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
४-१० वर्षाच्या लहान मुलांची कॉमन बारिकसारीक आजारपण, दुखणी, जखमा इ इ बाबत अनुभव आणि त्यावर सहज उपलब्ध असलेले घरगुती उपचार -
ऋयामच्या डास आहे ला डासाचे हे उत्तर
...मी डास आहे...
डास आहे...मी डास आहे..
चावणे हाच ध्यास आहे...
ओडोमॉसचा वास आहे
मच्छरदाणीचा फास आहे...
इलाज काही खास आहे....
बच्चु तयारी झक्कास आहे
आज रक्ताचा ना घास आहे..
झाला आता तास आहे....
शिकार नाही.. काय त्रास आहे
बंदोबस्त आता बास आहे ....
ऑल फॉर चॅरिटी बेकिंग चॅलेंज -"बेस्ट इन शो"
दर वर्षी मे महिन्यात आमच्या ऑफिसमधे चॅरिटी साठी बेकिंग चॅलेंज असते. यावर्षीही जास्तीतजास्त लोकांनी या चॅलेंजमधे भाग घ्यावा म्हणून मागच्या तीन एक आठवड्यांपासुन सोशल क्लबच्या रिमाईंडर इमेल्स येत होत्या.