"नमस्कार, नमस्कार... या या या.. कश्या आहात? खुप दिवसांनी आलात? ... अहोSSS, ऐकलत का? आपल्या त्या पमीच्या सासूच्या वैनी आल्यात बर का ..... अरे व्वा, मनू, बनू साठी सोबत 'जिगळ्या' आणल्यात आणि खास 'मटारच्या करंज्या' पण... छान छान... धन्स बरंका बाकी कश्या आहात? घरी सगळे ठीक? ... अहोSSS, 'च्यामारी' आणा की आता .....घ्या घ्या... आवडली ना? एकदम स्पेशल आहे बरका
आता आलाच आहात तर जेऊनच जा... आमच्या यांना काही त्रास नाही हो... यांना नवे पदार्थ ट्राय करायला गिनीपिग्ज हवेच असतात बर ते जौद्या... काय खाणार? ... काय नॉनव्हे़ज नाही??? ओह, आज मंगळवार नै का??? हम्म्म... पण आमच्या यांच्या हातचे नॉनव्हेज चाखाच तुम्ही एकदा... त्या माबो वर बघुन बघुन एक एक नव नव्या रेसिप्या करत असतात... कधी 'कोलंबीच कालवण' तर कधी 'लँब चॉप्स' आणि परवा तर कायतरी 'पोटली' मधल चिकन आणि काल 'केळीच्या पानातले बांगडे'...आणि हो .. ते 'मूर्ग शोले' राहिलच... आह्हा हा ... सुटलं न तोंडाला पाणी?? असु दे, परत कधीतरी....
चला जेऊन घेऊ अहोsss आजचा बेत काय आहे ओ? 'कैरीची कोशिंबीर', 'मसाला वांग', 'सांबार वड्या', 'भाजक्या मसाल्याची आमटी' आणि 'वरणफळं'. .. सह्हीच! आणि लाच्छा पराठा पण... क्या बात है?? अहो सोबत ती झणझणीत 'कांदा लसूण चटणी' पण घ्या हां...
व्वा! मस्तच झालं नै जेवण... आता 'जेवणानंतर काहीतरी गोडधोड' तर हवच :).... अहो घ्या, घ्या... २ टॉवर खल्लेत तरी हरकत नाही
काय म्हणता? पोट खुप भरलं? मग आता हे ...'हज'म'स्साला' घ्याच....मी तयारचं ठेवते हल्ली....
लागणारे जिन्नसः
लिंबाचा रस - अर्धी वाटी;
आले - १ इंच तुकडा;
थोडी पुदिन्याची पाने;
साखर - लिंबाचा रस किती आंबट आहे त्यावर अवलंबुन;
चाट मसाला;
चिमुटभर मिठ;
थंड लेमोनेड
हज'म'स्साला
१. आले किसुन त्याचा रस काढुन घ्यावा;
२. साखर आणि पुदिन्याची पाने खलबत्ता किंवा मिक्सरमधे वाटुन घ्यावीत.
३. लिंबाचा रस, आल्याचा रस आणि साखर-पुदिना मिश्रण आणि मिठ नीट एकत्र करावे. मग गाळणीतुन गाळून घ्यावे.
४. तयार अर्क आता बर्फाच्या रिकाम्या ट्रे मधे घालुन फ्रिझ करावा.
तयार क्युबा...
५. आयत्यावेळेस ग्लासात थंड लेमोनेड ओतावे. त्यात या अर्काच्या १-२ क्युब्ज सोडाव्यात आणि वरतुन थोडा चाट मसाला भुरभुरावा.... थंड गार असे हे "हज'म'स्साला' भरपेट जेवणानंतर नक्की प्यावे
१. आले, लिंबु, साखर, पुदिना इ इ प्रमाण आपापल्या आवडीनुसार घ्यावे;
२. मी अर्क बनवल्यावर अर्ध्या रसात थोडा खाण्याचा हिरवा रंग घातला.. जस्ट गंमत म्हणून
३. वरती दिलेला वेळ हा अर्क बनवण्यासाठी आणि शेवटच्या हाज'म'स्साला बनवण्यासाठी लागणारा वेळ आहे. फ्रिझ करण्याचा वेळ त्यात धरलेला नाही. फ्रिझ न करता डायरेक्ट अर्कही वापरु शकता.
४. तयार अर्काच्या फ्रोझन क्युब्ज, सेल्फ सिलींग बॅगमधे भरुन फ्रिझ करता येतिल. आयत्यावेळेस हव्या तेव्हढ्या क्युब्ज काढुन घ्याव्यात.
५. लेमोनेड अगदी थंडगार हवे लेमोनेड ऐवजी लेमस्क्वॉश पण चालेल.
त.टि.: यात स्पर्धेतल्या सगळ्याच मसाला पाककृतींची नावे टाकु शकले नाही त्याबद्दल क्षमस्व... ज्यांच्या पाकृ यात नाहीत त्यांना .... च्यामारी
लाजो,बर्लिनला कधी येतेस?
लाजो,बर्लिनला कधी येतेस? माझ्याकडेच राहायचं हं आग्रहाचं निमंत्रण आहे
सहीच्चे!!
सहीच्चे!!
वा ! व्वा !!
वा ! व्वा !!
आमचं पनीर आणि नान कोण खाणार
आमचं पनीर आणि नान कोण खाणार आता?
आणि ते अॅपल क्रिस्प तरी डेझर्टात द्या की!!
सहीच्चे!
सहीच्चे!
लाजो... लय म्हणजे लयच
लाजो... लय म्हणजे लयच भारी....!!!!!!
Lajo , mast!
Lajo , mast!
सही.
सही.
व्वा! भारी आहे एकदम!
व्वा! भारी आहे एकदम!
मस्तय.. उन्हाळ्यात प्यायला
मस्तय.. उन्हाळ्यात प्यायला भारी लागत असेल.
>>आह्हा हा ... सुटलं न तोंडाला पाणी?? असु दे, परत कधीतरी>> हा डायलॉग एकदम पुणेरी वाटतोय
बाई ग आता तुला दंडवत घालुन
बाई ग आता तुला दंडवत घालुन घालुन पाठ दुखतीये
पण तरी सुद्धा परत एकदा साष्टांग ------^-------
सही मी मिनोतीच्या कृतीने
सही मी मिनोतीच्या कृतीने फ्रूट पंचच्या क्युब्स करुन ठेवते. यंदा हा प्रकार करेन. लेमनेड, स्प्राइट किंवा फ्रेश लिंबु सरबतात पण मस्त लागतात.
लाजो, मस्तच! सुरवात, शेवट,
लाजो, मस्तच! सुरवात, शेवट, फोटो सर्वच मस्त !
आता मात्र हात टेकले बाई..
आता मात्र हात टेकले बाई.. खरेच साष्टांग नमस्कार...
अतिशय सुंदर पाकृ.... करुन पाहणे मस्ट..
वॉव, सह्हीच आहे मुखशुध्दी कम
वॉव, सह्हीच आहे मुखशुध्दी कम पाचक. गरज होतीच त्याची.
लाजो, रेसिपी, फोटो, पेयाचा रंग झक्कास. आणि लिहिलयस तर एकदम मस्त!
लाजोजी, आप महान हो! मस्तं!
लाजोजी, आप महान हो!
मस्तं!
लाजो, मस्तचं गं.गारे गार
लाजो,
मस्तचं गं.गारे गार वाटतंय ..या क्युब्ज लेमोनेड मधे घालुन पिण्याची आयडिया "लाजवाब"
भन्नाट!!!! लाजो तुला पुनश्च
भन्नाट!!!!
लाजो तुला पुनश्च सा.न.
लाजो काय मस्त आहे गं ही
लाजो काय मस्त आहे गं ही आयडिया. झक्कास लागेल हे उन्हाळ्यात प्यायला.
लाजो १ नंबर!! म्हणजे
लाजो १ नंबर!! म्हणजे रेसिपी,लिहिण्याची पध्दत तर एक नंबर आहेच पण पहिला नंबर तुलाच मिळणार
सही!
सही!
सहीच
सहीच
Take a bow....उर्फ
Take a bow....उर्फ दंडवत्.....:)
मस्त्...खुप आवडली
मस्त्...खुप आवडली रेसीपी...आणि लेख पण
लाजोवाब
लाजोवाब
रेसिपी आणि लिहिण्याची स्टाईल
रेसिपी आणि लिहिण्याची स्टाईल दोन्ही जबरदस्त!
धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद
धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद मंडळी
अहो, नमस्कार, दंडवत घालु नका हो... मला ऑकवर्ड वाटतं....
सायो पुण्यातली खोड ऑस्ट्रेलियात येऊन जात्येय होय
गारेगार वाटलं
गारेगार वाटलं
बाई ग आता तुला दंडवत घालुन
बाई ग आता तुला दंडवत घालुन घालुन पाठ दुखतीये
पण तरी सुद्धा परत एकदा साष्टांग ------^------->>>>>>>>>>>>>+++++++++++१११
मस्त
मस्त
Pages