एम

सूर्यास्त

Submitted by जयश्री हरि जोशी on 20 October, 2015 - 12:03

मोकळे केस करताना
तू किती खरी असतेस
प्रेमाच्या कवितेमधली
पहिलीच ओळ दिसतेस

तू पेडांमधुनी माझे
उकलून हृदय विणतेस
विसरल्या दिशांची गाणी
मग हट्टाने म्हणतेस

तू माझ्यानंतर माझा
सूर्यास्त रोज बघतेस
ढळणाऱ्या सूर्यामधले
कारुण्य होत जगतेस

शब्दखुणा: 

'...एम' चा गेम...

Submitted by लाजो on 6 June, 2012 - 04:31

कालपर्यंत होते तुझे माझ्यावर प्रेम
आवडायचे आपल्याला सगळे सेम टु सेम....
.

पण असं वाटतय आता विस्कटतोय आपला गेम
तुझ्या वागण्याचा हल्ली लागत नाहिये नेम...
.

महत्वाचं आहे का हे दिखावा आणि फेम
आपल्या जवळ असताना दोन अनमोल जेम...
.

संभाळत्येय मी तुला कशीबशी जेमतेम
सहन करता करता डोळ्यात पाणी केम...
.

वाटलं होतं थांबु जरा, सगळं होइल क्षेम
पण कारण दिलीस तु मला ती सगळी होती लेम....
.

मलाच वाटत्येय आता माझ्या हट्टावर शेम
माहित असुन सुद्धा की तुला मुश्किल करणं टेम...
.

आता मिच केलाय निश्चय, मिच बदलत्येय एम
मारून तुला डिच..........
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - एम