पंढरीची वारी

पंढरीची वारी

Submitted by ManasiB on 3 July, 2020 - 12:24

निघे पंढरीची वारी, सज्ज सारे वारकरी
अद्भुत तो सोहळा, विठ्ठल विठ्ठल गजरी

आळंदीची ग माउली, पालखीत विराजित
तुकोबाची पालखी, देहूमधून निघत

विठू दर्शनाची हाव, मनी भक्तीचा तो भाव
सद् वृत्तीचा स्वभाव , वारकरी त्याचे नाव

गळा तुळसीची माळ, तुळशीवृंदावन डोई
टाळ वाजवीत चाले, नाम विठोबाचे घेई

अनवाणी तो चालत, ऊन अन पावसात
भाव भोळा तो भक्तीत , ठेवे हरी स्मरणात

हाती पताका भगवी, रिंगणात तो नाचवी
‘ज्ञानोबा तुकाराम’, मुखे गजर करवी

अश्व दौडे रिंगणात, विठ्ठलाच्या भजनात
मृदुंगाच्या गजरात, वारी पंढरीस जात

वारी

Submitted by महादेव सुतार on 22 July, 2018 - 12:53

दिंडी घेऊनी येतोय पंढरीच्या वारी
नाम मुखी घेत तुझे येतोय देवा तुझ्या दारी
विठ्ठला कीर्ती तुझी अनंत
भक्त तुझा भाग्यवंत
कृपा करा देवा माझ्यावर
असो तुझा आशीर्वाद गोरगरिबांवर
येवो त्यांच्या सुख दारी
मुखी नाम घेत देवा तुझे
दिंडी घेऊनी येतोय पंढरीच्या वारी

विषय: 
शब्दखुणा: 

गोत्र माझे भागवत

Submitted by पुरंदरे शशांक on 10 July, 2015 - 07:05

गोत्र माझे भागवत

आज सोनियाचा दिन
दिंडी येतसे वेशीला
संतमेळ्यासवे विठू
स्वये जाई पंढरीला

दिंड्या पताकांचे भार
आले वैकुंठ घरास
विठु नामाचा गजर
काय वानावी मिरास

भाळी अबीर चंदन
मुखे हरिचा गजर
नुरे संसाराचा पाश
विठु व्यापी अवकाश

तुका-माऊली गजर
धन्य गर्जते अंबर
डोळे वाहती भरुन
भक्ति अंतरापासून

विठु सखा भगवंत
गोत्र माझे भागवत
वारकरी गणगोत
नमनाची रीतभात

वारी जाते पंढरीला
चित्त वाहिले विठ्ठला
दुजे नाठवे जीवाला
नामरुप श्वास झाला .....

दिंडी चालली चालली...

Submitted by जिप्सी on 6 July, 2013 - 11:02

आषाढवारी २०१३ क्षणचित्रे
स्थळः पूलगेट ते मगरपट्टा, हडपसर, देवाची उरूळी (पुणे)
=======================================================================
=======================================================================

दिंडी चालली चालली विठ्ठलाच्या दर्शनाला
घुमे गजर हरिनामाचा भक्तड नामात रंगला

टिळा वैष्णव हे ल्याले गळा हार तुळशीमाळा
एकतारी देते साथ टाळ-मृदुंगाच्या ताला
भागवताची पताका आलिंगीते गगनाला
दिंडी चालली चालली...

गळा दाटला अभंग घोष विठु रखुमाई
अनवाणी पाउलांना कष्ट जाणवे न काही

पंढरीची वारी प्रकाशचित्रे.

Submitted by ferfatka on 1 July, 2013 - 07:33

संत तुकोबारायांच्या पालखीचे देहूतून शनिवारी प्रस्थान झाले. रविवारी संध्याकाळी ५ च्या सुमारास पालखी पिंपरी-चिंचवड हद्दीत दाखल झाली. तेथून पुढे पालखी आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात मुक्कामाला जाण्यास निघाली. महापालिकेच्या वतीने संत तुकाराममहाराज व शिवाजीमहाराज यांच्या ‘भक्ती-शक्ती’च्या प्रतिकृतीचे प्रमुख दिंडेकºयांना वाटप करण्यात आले. त्याचा आनंद बºयाच जणांच्या चेहºयावर होता. पुणे-मुंबई महामार्गावर भक्तीचा जनसागरच लोटला होता. त्यातील काही प्रकाशचित्रे.

वारी पुढे पंढरपूरकडे प्रस्थान होईल. मायबोलीच्या वाचकांनी स्वत: काढलेली छायाचित्रे टाकून हा धागा चालू ठेवता येईल.

शब्दखुणा: 

पंढरीची वारी - हडपसर मार्गे

Submitted by रंगासेठ on 30 June, 2011 - 11:03

मगरपट्टा चौकातील मांदियाळी

वारीत लहान मुलेही सहभागी झालीत.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - पंढरीची वारी