पुढे वाट काळोखी
चल ओंजळीत
उजेड घेऊन जाऊ
नसुदे निवारा कुठे
चल चांदण्यांचे
पांघरून करुन राहु
हा प्रवास आहे दुर्धर
चल वाटेसाठी
स्वप्नांची शिदोरी घेऊ
येतील वाटेत क्षण
चल गुंफून
आठवणी मनांत ठेऊ
अजय सरदेसाई (मेघ)
१६/३/२०२२ , ७:०० PM
meghvalli.blogspot.com
प्रत्येक माणसां कडून काही तरी चूक होत असते,त्याच विषयाला हात घालून मी एक कविता लिहिली आहे.मी तुमच्यापुढे सादर करतो,पण आवडल्यास भरपूर दाद द्या हि विनंती आहे.
कवितेचे शीर्षक आहे *"चूक तर माझीच आहे"*
*चूक तर माझीच आहे*
जीवापाड प्रेम करण्याची
आयुष्यातून दूर गेल्यावरही
परतीची वाट बघण्याची
*चूक तर माझीच आहे*
घेतले वचन जन्मोजन्मी साथ राहण्याचे
एक जन्म पण न राहिलो साथ
उरले ते फक्त स्वप्न बघण्याचे
ही वाट एकटीची....
दूरवर कुठेतरी भास तुझा होतो...
तुझ्या विचारांचा गंध मनात अजूनही दरवळतो...
माझे अश्रू सुध्दा बोलतात माझ्याशी...
मैत्री झाली आहे त्यांची या बदलत्या रंगाशी....
रणरणत्या उन्हातली पाऊलवाट,
बघते तुझी अतोनात वाट....
कितीही बहरला ऋतु हिरवा,
तरी मनात दुःखाचे धुके दाट...
हे वादळ येण्यापूर्वी
पाऊस होता मुसळधार...
त्यात चिंब भिजण्यापूर्वी
उन्हातच केला एकटीने प्रहार...
सांगितले स्वतःला थांब किनाऱ्याशी,
सागरालाही कळू दे तू खूणगाठ बांधली आहेस मनाशी....
आजही हे मन तुझीच वाट पाहत,
जेव्हा चांदण्यातल्या चंद्रला पाहत,
खळाळणार्या झर्यामध्येही तुझाच आवाज ऐकू येतो,
पाणा-फुलांमध्येही तुझाच सहवास जाणवतो,
वेळेबरोबर आयुष्य पुढे चालेलही,
पण हे मन मात्र फक्त तुझीच वाट पहिलं,
फक्त तुझीच वाट पहिलं !!
मला समजलीये
स्वप्नांच्या प्रदेशाला जाणारी वाट..
चंद्राशिवायच्या चांदण्यांनी भरलेल्या रात्रीत,
जेव्हा चांदण्या उतरलेल्या असतात क्षितिजावर
एका उडीत चांदण्यांवर पाय पडतील इतक्या जवळ..
आणि मग त्या चांदण्यांचे ठसे घेवुन जातील मला
स्वप्नाच्या प्रदेशात..
जवळच आहे..
स्पष्ट दिसतीये वाट..
तिथवरच तर चालायचय...
.
.
.
क्षितिजापर्यंत....