ही वाट एकटीची.....
ही वाट एकटीची....
दूरवर कुठेतरी भास तुझा होतो...
तुझ्या विचारांचा गंध मनात अजूनही दरवळतो...
माझे अश्रू सुध्दा बोलतात माझ्याशी...
मैत्री झाली आहे त्यांची या बदलत्या रंगाशी....
रणरणत्या उन्हातली पाऊलवाट,
बघते तुझी अतोनात वाट....
कितीही बहरला ऋतु हिरवा,
तरी मनात दुःखाचे धुके दाट...
हे वादळ येण्यापूर्वी
पाऊस होता मुसळधार...
त्यात चिंब भिजण्यापूर्वी
उन्हातच केला एकटीने प्रहार...
सांगितले स्वतःला थांब किनाऱ्याशी,
सागरालाही कळू दे तू खूणगाठ बांधली आहेस मनाशी....