ही वाट एकटीची....
दूरवर कुठेतरी भास तुझा होतो...
तुझ्या विचारांचा गंध मनात अजूनही दरवळतो...
माझे अश्रू सुध्दा बोलतात माझ्याशी...
मैत्री झाली आहे त्यांची या बदलत्या रंगाशी....
रणरणत्या उन्हातली पाऊलवाट,
बघते तुझी अतोनात वाट....
कितीही बहरला ऋतु हिरवा,
तरी मनात दुःखाचे धुके दाट...
हे वादळ येण्यापूर्वी
पाऊस होता मुसळधार...
त्यात चिंब भिजण्यापूर्वी
उन्हातच केला एकटीने प्रहार...
सांगितले स्वतःला थांब किनाऱ्याशी,
सागरालाही कळू दे तू खूणगाठ बांधली आहेस मनाशी....
अंतर आहे फार दोन विचारांत,
हिम्मत आहे एकतीच्याच या संहारांत....
जाणिव झाली आहे आता उभ्या आयुष्याची,
जगू शकेल मी जेव्हा साथ नसेल कोणाची....
स्वप्नं बघता बघता रात्रीची झाली पहाट,
अपूर्ण त्या स्वप्नाचा भला मोठा होता थाट....
जागी झाले स्वप्नातून,
आले भानावर त्या वेगळ्याच विश्वातून....
हिम्मत आली माझ्यात भक्कमपणे उभे राहण्याची,
स्वगत करत होते मन नाही आता वाट कोणाची.....
काय होतीस तू काय झालीस तू,
एकच विचार डोकावत होता...
हिम्मत वाढत होती आणि आत्मविश्वास बळकट होत होता....
आता एकच ध्यास आणि एकच आस,
नव्या प्रवाहाचा नवा उल्हास.....
स्वतःमध्ये शोधला मी आनंद जगण्याचा,
मार्ग शोधला मी पुढच्या वळणाचा.....
- नेहा हातेकर
अप्रतिम लिहिलीये कविता..
अप्रतिम लिहिलीये कविता..
सकारात्मक दृष्टीकोन आवडला.. पुकाप्र!
छान कविता. शेवट आवडला
छान कविता. शेवट आवडला