वाट..

Submitted by मी मुक्ता.. on 2 April, 2011 - 03:34

मला समजलीये
स्वप्नांच्या प्रदेशाला जाणारी वाट..
चंद्राशिवायच्या चांदण्यांनी भरलेल्या रात्रीत,
जेव्हा चांदण्या उतरलेल्या असतात क्षितिजावर
एका उडीत चांदण्यांवर पाय पडतील इतक्या जवळ..
आणि मग त्या चांदण्यांचे ठसे घेवुन जातील मला
स्वप्नाच्या प्रदेशात..
जवळच आहे..
स्पष्ट दिसतीये वाट..
तिथवरच तर चालायचय...
.
.
.
क्षितिजापर्यंत....

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

<<तिथवरच तर चालायचय...
.
.
.
क्षितिजापर्यंत....>>>
सुंदर.......

धन्यवाद UlhasBhide,

गिरिशजी, Happy अतिशय काव्यत्मक प्रतिसाद.. छानच.. Happy

आनंदयात्री, फारच बुवा हुशार तुम्ही.. Happy Wink

निशदे, खूप खूप आभार...