ओंजळ

चल

Submitted by Meghvalli on 23 March, 2024 - 08:08

पुढे वाट काळोखी
चल ओंजळीत
उजेड घेऊन जाऊ

नसुदे निवारा कुठे
चल चांदण्यांचे
पांघरून करुन राहु

हा प्रवास आहे दुर्धर
चल वाटेसाठी
स्वप्नांची शिदोरी घेऊ

येतील वाटेत क्षण
चल गुंफून
आठवणी मनांत ठेऊ

अजय सरदेसाई (मेघ)
१६/३/२०२२ , ७:०० PM

meghvalli.blogspot.com

रिती ओंजळ !

Submitted by किंकर on 7 October, 2013 - 22:29

रिती ओंजळ !
झुळूक वाऱ्याची दुरुनी अलवार आली
मनातील आठवणींची तार झंकारली

जरी भेटलो होतो नुकताच तिला मी
वाटत राहते जणू युगे युगेच लोटली

आज स्वप्नात येत तिने जागविले
डोळ्याची कड होती ओथंबली

वाटले वाट पाहील त्याच वळणावरी
म्हणुनी पावले आपोआप वळाली

पाठमोरी सहजच जाता पुढे ती
माळलेला गजरा ओघळून गेली

परिमल त्या सुकलेल्या बकुळीचा
मनीचा परिसर गंधाळून गेली

कधी गुंतलो कसे गुंफलो
या कोड्यातच मने आक्रंदली

तिचे घेवूनी दान सर्वस्वाचे
ओंजळ माझी रितीच राहिली

Subscribe to RSS - ओंजळ