घटक पदार्थः
ओल्या भुईमुगाच्या शेंगा - एक किलो
लसूण - चार ते पाच गड्डे
हिरव्या मिरच्या - शंभर ग्रॅम
अर्धा चहाचा चमचा तेल
मीठ चवीप्रमाणे
पद्धतः
ओल्या भुईमुगाच्या शेंगा (दाणे टचटचीत भरलेल्या) धुऊन खमंग भाजून घ्याव्यात. भाजताना त्या फार कोरड्या पडणार नाहीत किंवा त्यांना जळकटून कोळश्याची चव येणार नाही याची काळजी घ्यावी.
नमस्कार,
भिडे काकांच्या 'पहिले चुंबन' या कवितेला चाल लावायचा प्रयत्न केलाय.
माझ्या दिव्य (!) आवाजात त्याचं पहिलं कडवं गाऊन बाकी बासरीवर वाजवून रेकॉर्ड केलंय.
इथे हा प्रयत्न ऐकता येईल.
ऐकून तुमची स्पष्ट मतं कळवावीत ही विनंती.
चाल चांगली वाटली आणि ती गाण्यास कुणी उत्सुक असेल तर आनंदच होईल.
- चैतन्य.
साधारण माझ्या बारवीच्या परीक्षेच्या आधी काही महिने मी शास्त्रीय संगीत ऐकायला सुरुवात केली. त्या-आधी क्वचित रेडिओवर ऐकलं असेल तरच, अन्यथा कॅसेट आणून ऐकलं नव्हतं कधी. पण ऐकायला 'व्होकल क्लासिकल'ने सुरुवात झाली आणि मग 'इंस्ट्रुमेंटल' ! वाद्यांमध्ये बासरी अग्रगण्य. पं. हरिप्रसाद चौरासिया, पं. रघुनाथ सेठ, पं. विजय राघव राव यांच्या कॅसेट्स तुडुंब ऐकल्या आणि आपोआपच मनात ठरलं की 'जर एखादं वाद्य शिकलो, तर बासरीच शिकायची'. शिक्षण पूर्ण होईपर्यंत काही योग नाही आला पण नोकरीनिमित्ताने चेन्नईला आलो आणि सुदैवाने फार चांगले (आणि हिंदी बोलू शकणारे) गुरू मिळाले.
दिवाळी आली की उत्साह, सजावट, चकली-करंज्यांसोबतच आणखी एक आठवण येते.... लुटुपुटीच्या किल्ल्याची !
यंदाची दिवाळी भारताबाहेर मालदीवमध्ये साजरी करताना अर्थातच ह्या सगळ्याचीच उणीव चुटपुट लावत होती.
लेकाला दिवाळीच्या आठवणी सांगताना किल्ल्याबद्दल सांगत होते.
पण कधीच न पाहिलेल्या गोष्टीची कल्पना करायला त्याला काही जमेना.
मनात आलं , इथेच किल्ला बनवायचा प्रयत्न केला तर !
त्याच इच्छेतून साकार झाला आमचा किल्ला.
१. किल्लेबांधणीसाठी कच्चा माल.
स्टँप कलेक्शन म्हणजे लहानपणी केलेले उद्योग असे बर्याच जणांना वाटते. पण लहानपणीची ही हौस मोठेपणीही टिकवुन ठेवलेले काहीजण असतात.
अजुनही पत्रावरुन आलेल्या त्या इवलाश्या चौकोनी कागदाच्या तुकड्यावर छापलेली विविध रंगित चित्रे आणि शब्द पाहिले कि खुपच गंमत वाटते.
मी लहानपणी स्टँप गोळा करायचे. ते कलेक्शन घरी भारतात आहे कुठेतरी. नंतर बर्याच वर्षांनी इथे पुन्हा सुरुवात केली. सध्याचे कलेक्शन अगदीच छोटेस आहे कारण आता कुणी पत्रच पाठवत नाही.
परदेशातुन स्टँप पाठवण्यासाठी सोप्पा आणि स्वस्त उपाय म्हणजे पोस्टकार्ड पाठवणे.
इथे कुणी स्टँप किंवा पोस्टकार्ड कलेक्टर्स असतील तर त्यांच्यासाठी हा धागा.
जे खूप सुंदर आहे.....ते प्रेम
जे खूप कठीण आहे.....ते प्रेम
ज्याची काही परिभाषा नाही.....ते प्रेम
शब्दाविना होणारा संवाद .....ते प्रेम
समझायला जिथे बोलावे लागत नाही.....ते प्रेम
जे खूप सुंदर आहे ...ते प्रेम
मित्रांनो हा माझा गाण म्हणण्याचा पहिलाच प्रयत्न. ऐका आणि अभिप्राय कळवा.
शूर आम्ही सरदार