स्टँप / पोस्टकार्ड कलेक्शन
Submitted by सावली on 1 November, 2011 - 22:57
स्टँप कलेक्शन म्हणजे लहानपणी केलेले उद्योग असे बर्याच जणांना वाटते. पण लहानपणीची ही हौस मोठेपणीही टिकवुन ठेवलेले काहीजण असतात.
अजुनही पत्रावरुन आलेल्या त्या इवलाश्या चौकोनी कागदाच्या तुकड्यावर छापलेली विविध रंगित चित्रे आणि शब्द पाहिले कि खुपच गंमत वाटते.
मी लहानपणी स्टँप गोळा करायचे. ते कलेक्शन घरी भारतात आहे कुठेतरी. नंतर बर्याच वर्षांनी इथे पुन्हा सुरुवात केली. सध्याचे कलेक्शन अगदीच छोटेस आहे कारण आता कुणी पत्रच पाठवत नाही.
परदेशातुन स्टँप पाठवण्यासाठी सोप्पा आणि स्वस्त उपाय म्हणजे पोस्टकार्ड पाठवणे.
इथे कुणी स्टँप किंवा पोस्टकार्ड कलेक्टर्स असतील तर त्यांच्यासाठी हा धागा.
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा