स्टँप कलेक्शन म्हणजे लहानपणी केलेले उद्योग असे बर्याच जणांना वाटते. पण लहानपणीची ही हौस मोठेपणीही टिकवुन ठेवलेले काहीजण असतात.
अजुनही पत्रावरुन आलेल्या त्या इवलाश्या चौकोनी कागदाच्या तुकड्यावर छापलेली विविध रंगित चित्रे आणि शब्द पाहिले कि खुपच गंमत वाटते.
मी लहानपणी स्टँप गोळा करायचे. ते कलेक्शन घरी भारतात आहे कुठेतरी. नंतर बर्याच वर्षांनी इथे पुन्हा सुरुवात केली. सध्याचे कलेक्शन अगदीच छोटेस आहे कारण आता कुणी पत्रच पाठवत नाही.
परदेशातुन स्टँप पाठवण्यासाठी सोप्पा आणि स्वस्त उपाय म्हणजे पोस्टकार्ड पाठवणे.
इथे कुणी स्टँप किंवा पोस्टकार्ड कलेक्टर्स असतील तर त्यांच्यासाठी हा धागा.
जमल्यास स्टँपची अदलाबदल करणे , किंवा खुप ओळख झाल्यास नविन ठिकाणचे स्टँप, पोस्टकार्ड पाठवणे हे करता येईल.
विनंती - कृपया आपला पत्ता कुणाही अनोळखी व्यक्तीला देऊ नका आणि इथेही लिहु नका.
हा धागा विरंगुळा मधे काढावा असे वाटले होते पण तिथे लेखनाचा धागा काढता येत नाही फक्त गप्पांचे पानच काढता येते. कृपया हा धागा योग्य ठिकाणी हलवणार का ?
मला पुर्वी खुप हौस होती.
मला पुर्वी खुप हौस होती. पत्रमित्र अनेक होते. आताही आवडेल पत्र पाठवायला ! काही जूनी पत्रे घरच्या कपाटात अजून आहेत. गेल्यावेळी एका मित्राला ३० वर्षांपुर्वी त्याने मला लिहिलेले पत्र दाखवले होते.