नमस्कार मायबोलीकर! मी मायबोलीचा नवीन सदस्य. तुमच्यासाठी एक रचना घेऊन आलो आहे. तुमच्या प्रतिक्रियेची अपेक्षा आहे.
अगदी परखडपणे तुमच्या प्रतिक्रिया मांडा. मग त्या सकारात्मक असोत, नकारात्मक असोत, तटस्थ असोत वा सल्ले/उपदेश असोत. स्वयंसुधारणेसाठी मला त्याचा नक्कीच उपयोग होईल.
( कवीला व्यासपीठ मिळणं, श्रोते मिळणं, हि पर्वणीच आहे. आणि कोणा कवीला जर श्रोते स्वतःहुन म्हणत असतील कि आम्ही तुमच्या नवनवीन कविता ऐकण्यासाठी आतुर झालो आहोत, तर ते त्या कवीचं अहोभाग्यच. असं भाग्य एका नवकवीच्या वाट्याला आलं. त्याची हि कविता. कवितेचं नाव आहे "कविराज" )
सदैव झिंगलेला दिसतो
प्रेमात पडलेला दिसतो
वेडा कवी फक्त त्याच्या
शब्दात हरवलेला असतो
प्रेम ही चालते त्याला
प्रेत ही चालते त्याला
मुख्य म्हणजे लिहायला
सदैव उतविळ तो असतो
त्याच्या नादी लागू नका
जास्त जवळ जावू नका
दुरूनच चांगला दिसतो
वेड्या लाटेचा फटका असतो
स्वप्नातील प्रेम कधीही
तया जगी सापडत नाही
अन स्वप्नातून कधीही
तो खाली उतरत नाही
मग व्हायचे तेच होते
शब्द वेडे जगणे उरते
अन काळाच्या वावटळी
पान नि पान उडून जाते
नटुनिया विभ्रमांनी
कविता ही पानोपानी
नाद लय रंगातुनी
पिंगा घाली माझ्या मनी ll १ ll ll
संगे हसुनी खेळूनी
कधी रडूनी झुरुनी
भान अवघे सुटुनी
आलो आनंद भुवनी ll २ll ll
शब्द नवीन जुन्यांचे
कधी तुमचे नि माझे
शब्द गूढ अनवट
सोपे सरळ सोट ll ३ ll ll
हात घालूनिया हाती
जेव्हा नवे रूप घेती
अर्थ धुमारे फुटती
नव्या पाहता दृष्टी ll ४ ll ll
अहो शब्दाचिया बळे
कवी ज्ञानोबाची बाळे
धन्य तया स्फूर्तीलागे
वर चिरंजीव मागे ll ५ll ll
विक्रांत प्रभाकर
कविता म्हणजे घट कवी गोरा कुंभार
कल्पनांची माती तिंबून देतो त्यास आकार
कविता जर अभंग कवी साक्षात किर्तनकार
भावनांचे करुन निरुपण घडवतो जणु साक्षात्कार
कविता जणु पाउस कवी बनतो मेघ
चिंब करते अनुभुती कवितेतील प्रत्येक रेघ
मनाच्या खोल जखमा, कवि शल्य विशारद
टाके घालतो कवितेचे, फुंकर मारुनी अलगद
कविता असावी प्रकाश कवी काजव्यासम हवा
जगी अंधार दाटता स्वयंस्फुर्तीने दिपावा
©मंदार खरे
आमच्या ज्येष्ठ नागरिकांच्या गप्पाटप्पांमध्ये श्री फाटक यांना शाळेत असतांना पाठ केलेले एक काव्य व त्यामागची कथा पण आठवली (वय होईल तसे कोणतीही गोष्ट वेळीच आठवणे ही देखील कौतुकाचीच बाब ठरते) . ती वाचकांनाही आवडेल म्हणून सांगतो. त्या काव्याचा रचनाकार कवी होता ’भुक्कंड’! राजा काही कारणाने त्याच्यावर रागावला आणि त्याने भुक्कंडला भर दरबारात मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. त्यावर कवीने तेथल्या तेथे खालील काव्य रचून राजाला सुनावले; आणि राजाने तात्काळ त्याला दोषमुक्त केले.
भट्टिर्नष्टो भारवीयोsपि नष्टः !
मी खूप काही बोल्लो
भडाभडा बोल्लो
भडास काढली, सगळी
तू ओठ मुडपून
एक टक बघत बसलीस
माझ्याकडे
मग हलकेच मान तिरपी केलीस
म्हणालीस,
"कवी आहेस नुस्ता..."
ग्रामिण मुम्बईकर
१.२३ रात्र
३१ मार्च ११
मी कवी नव्हतोच कधी,
एक दिवस अचानक तू आलीस, मग तुझे भास आले,
आणि नकळत त्या भासांच्या ओलाव्यातून कवितेचे पाझर फुटले...
मला मात्रा, अंतरे काहीच कळत नाहीत,
कळतात ते फक्त आपले निशब्द डोळे,
काळासोबत बदललेले आपले खोटे चेहरे
आणि नवीन नवीन क्षितीज गाठणारी आपली अंतरे…
मी फक्त, कधी आपल्या मनातला पाऊस झालो,
कधी, न बोलता आलेले काही शब्द,
कधी झालो तुला हवा असलेला क्षण,
तर कधी नकळत तुझ्या मनातली कळ झालो…