Submitted by Rohan_Gawande on 2 March, 2011 - 05:37
मी कवी नव्हतोच कधी,
एक दिवस अचानक तू आलीस, मग तुझे भास आले,
आणि नकळत त्या भासांच्या ओलाव्यातून कवितेचे पाझर फुटले...
मला मात्रा, अंतरे काहीच कळत नाहीत,
कळतात ते फक्त आपले निशब्द डोळे,
काळासोबत बदललेले आपले खोटे चेहरे
आणि नवीन नवीन क्षितीज गाठणारी आपली अंतरे…
मी फक्त, कधी आपल्या मनातला पाऊस झालो,
कधी, न बोलता आलेले काही शब्द,
कधी झालो तुला हवा असलेला क्षण,
तर कधी नकळत तुझ्या मनातली कळ झालो…
मी खरच कवी नव्हतो कधी,
माझी कविता म्हणजेच तू होतीस,
तुझे डोळे म्हणजेच माझी साधना होती,
आणि तुझे शब्द म्हणजे माझी प्रेरणा होती…
रोहण गावंडे..
Date: March 2, 2011
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
छान.. मी फक्त, कधी आपल्या
छान..

मी फक्त, कधी आपल्या मनातला पाऊस झालो,
कधी, न बोलता आलेले काही शब्द,
कधी झालो तुला हवा असलेला क्षण,
तर कधी नकळत तुझ्या मनातली कळ झालो… >> हे आवडलं..
धन्यवाद मुक्ता...
धन्यवाद मुक्ता...
वाहवा रोहन...बरेच दिवसांनी
वाहवा रोहन...बरेच दिवसांनी दिसलात...
नेहमीप्रमाणेच अप्रतिम कविता...
एक दिवस अचानक तू आलीस, मग तुझे भास आले,
हे सगळ्यात जास्त आवडले...
खरंय, या जगासारखे भासमान काही नाही...
आवडली
आवडली
आशुचँप, भरत मयेकर,
आशुचँप, भरत मयेकर, प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद..
@ आशुचँप: नवीन नवीन लिहिण्याचा जरूर प्रयत्न करील..
कधी झालो तुला हवा असलेला
कधी झालो तुला हवा असलेला क्षण,
तर कधी नकळत तुझ्या मनातली कळ झालो…
मी खरच कवी नव्हतो कधी,
माझी कविता म्हणजेच तू होतीस,
>>>
खयाल आवडले रोहणराव!
धन्यवाद!
-'बेफिकीर'!
आवडली!
आवडली!
सहजसुंदर..! भावली..!
सहजसुंदर..! भावली..!
बेफिकीरजी, वारा, अमित.
बेफिकीरजी, वारा, अमित. प्रोत्साहनाबद्दल खूप आभार...