फुल

शब्दफुलांची बाग

Submitted by Meghvalli on 22 March, 2024 - 00:26

शब्दफुलांच्या सुंदर बागेतुन मी शब्द वेचून आणतो।
शब्दांचा एक गुछ गुंफून मी कविता सादर करतो।।

शब्द हे निर्जिव कसे जिवंत होऊन बागडतात जणु ससे।
हृदयाचा ठाव घेऊनी कुठे दडून हे बसतात आणि कसे।।

कधी कधी तिखट शब्द बोचरे होऊन टोचतात जणू काटे।
घालून घाव हृदयावर वाहतात अश्रु होऊन डोळ्यां वाटे।।

शब्द अनोखे नी दुर्मिळ ओवुन बनविले मी अनेक अलंकार।
त्या अलंकारां नी तिज मडवताच तीच्या सौंदर्यास नूरला पार।।

विविध रंगाच्या विविध ढंगांच्या विविध छंदांच्या कविता।
वैविध्याने नटलेले शब्द चित्र बहरले कागदावर लिहिता।।

"असंही काही नाही"

Submitted by मी_अनामिक on 6 October, 2019 - 10:18

तु प्रेम करावस माझ्यावर... असंही काही नाही
तु हवीस आयुष्यात माझ्या... असंही काही नाही

आठवणी कवटाळून हसता येणार नाही कदाचित
म्हणुन रडेनच आयुष्यभर... असंही काही नाही

समुद्राच्या लाटांशी सुर बरे जुळतात माझे
मिळेलच गलबता किनारा... असंही काही नाही

मिळेल मकरंद अमाप त्याला प्रत्येक फुलावर
आवडेलच प्रत्येक फुल... असंही काही नाही

दुःखाशी जरा कमी गाठभेट होते
दिमतीला सुखच... असंही काही नाही

हल्ली हल्ली आठवण तुझी येईनाशी झालीये
म्हणुन विसरेनच मी तुला... असंही काही नाही

शब्दखुणा: 

प्रेम फुल

Submitted by विनोद. on 22 January, 2019 - 22:00

प्रेम फुल

सोडताना हात तुझा मनी काहूर दाटे
नजरेआड करताना आयुष्य क्षणभंगुर वाटे
हवालदिल मी तुझ्या कडे एकटक पाही
पाहता पाहता तुला, तुझाच होऊन राही

अगं वेड लावलास मला वेडा मी झालो
तू नेशील त्या वाटेवर पाठीमागे आलो
दुरावलो सगळ्यांपासून हरवलं मी मला
आता परत जा म्हणतेस पटत का तुला

पाऊलखुणा ही पुसल्या मी, प्रेमवेडे चाळे
मनो मनी बांधले स्वप्नांचे एकावर एक माळे
रमलो ग मी तुझ्यात मंत्रमुग्ध झालो
क्षणो क्षणी हृदयात तुला साठवत आलो

शब्दखुणा: 

फुलांची दुनिया भाग ३)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 14 February, 2011 - 02:16

पाली दर्शानावरुन येताना हॉटेल ग्रिन मध्ये गेलो तिथली फुले.
हे काही डेलियाचे प्रकार
phule1.JPGphule5.JPGphule8.JPG

कोबी/फ्लॉवर सारखे दिसणारे फुल
phule.JPG

शेवंता बाय म्हणजेच शेवंती
phule6.JPG

डबलची गुलछडी/रजनिगंधा/निशीगंधा

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

फुलांची दुनिया भाग २)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 18 January, 2011 - 03:50

पहा ही आवडता का ?
प्रचि १)
phul1_1.JPG

प्रचि २)
phul2_0.JPG

प्रचि ३)
phul3_0.JPG

प्रचि ४)
phul4_1.JPG

प्रचि ५)
phul5_0.JPG

प्रचि ६)
phul6_0.JPG

प्रचि ७)

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - फुल