शब्दफुलांची बाग

Submitted by Meghvalli on 22 March, 2024 - 00:26

शब्दफुलांच्या सुंदर बागेतुन मी शब्द वेचून आणतो।
शब्दांचा एक गुछ गुंफून मी कविता सादर करतो।।

शब्द हे निर्जिव कसे जिवंत होऊन बागडतात जणु ससे।
हृदयाचा ठाव घेऊनी कुठे दडून हे बसतात आणि कसे।।

कधी कधी तिखट शब्द बोचरे होऊन टोचतात जणू काटे।
घालून घाव हृदयावर वाहतात अश्रु होऊन डोळ्यां वाटे।।

शब्द अनोखे नी दुर्मिळ ओवुन बनविले मी अनेक अलंकार।
त्या अलंकारां नी तिज मडवताच तीच्या सौंदर्यास नूरला पार।।

विविध रंगाच्या विविध ढंगांच्या विविध छंदांच्या कविता।
वैविध्याने नटलेले शब्द चित्र बहरले कागदावर लिहिता।।

या बागेतील शब्दफुलांचे कोण जाणे काय असे प्रारब्ध।
कधी नशिबी असती अभंग भक्तीचे कधी शृंगारिक छंद।।

शब्द माउलींच्या लेखणीतून ओघवतात बनून विराणी।
शब्द तेच पाझरती 'भटांच्या' लेखणीतून बनून प्रेम गाणी।।

'मेघ' ही शब्द फुलें वेचून आला पण लेखणी झाली स्तब्द।
कळेनाच मज आता कसे शब्द गुंफुनी करावे कविता बद्ध।।

मंगळवार , १२/०३/२०२४ , १२:२७
अजय सरदेसाई (मेघ )

https://meghvalli.blogspot.com/

Group content visibility: 
Public - accessible to all site users