माझं दुःख
माझं दुःख माझ्याशी
एकांती वाद घालत होतं
म्हणालं
सुखाचे सगळे असतात
माझं का कोण नसतं?
मी म्हणालो सर्वाठायी तू
असतोस, उगा का रडतोस
अरे तू तर कर्माचा आरसा
माझ्यासाठी तू सुखच जसा
तरीही त्याच्या हट्टाखातर
झिजवले जोडे शेजारीपाजारी
बंद दारं सारी, नव्हते कुणी घरी
मग माझ्याच घरी
घातली त्याची पथारी