रंपाट

एका सुजलेल्या शहरात...

Submitted by ग्रामिण मुम्बईकर on 13 January, 2011 - 07:31

एका सुजलेल्या शहरात
दुःख फिरतंय बाईकवरून रंपाट

प्रयत्नांचे सिग्नल तोडत
नशीबाला साथीला घेत
धूळभरल्या हवेत
अश्रू झालेत चिकार

एका सुजलेल्या शहरात
दुःख फिरतंय बाईकवरून रंपाट

एका सुजलेल्या शहरात
फ्ल्यायओव्हरचं काम
मूठभर कारवाल्यांसाठी
आयुष्याचं दाम

पिलर एखादा तुटू दे
इन्शुरन्स क्लेम मिळू दे
पांढर्‍याशुभ्र झब्ब्याखाली
फक्त मन नसू दे भिकार

एका सुजलेल्या शहरात
दुःख फिरतंय बाईकवरून रंपाट

परफ्यूम शिंपडून निघालो
घामाचा झाकायला वास
फुटलाच कुठे बॉम्ब तर
रक्ताचं करू काय

गुलमोहर: 
Subscribe to RSS - रंपाट