मित्र तु माझा,
धीराचा पाठीराखा......
शब्द एकच तुझा ,
देई आकाशी झेपवणारा झोका....
तुटता आशा ,
ओवतो सुईत धागा ....
निर्धास्त पतंग मी,
न दिसणारा तु मांझा ....
नको साथ तुझी ,
नको हळवासा दिलासा.....
घट्ट आहे मन माझे,
जणू स्तंभ तूच त्याचा.....
वावरते जिथे जिथे मी,
असतो त्यात सहवास तुझा ....
ओढ नाही मला तुझी ,
नांदतो अंतरात माझ्या तू सखा....
Rudra......
सखा ज्ञानेश्वर
**********
सखा ज्ञानेश्वर
शब्दांचा सागर
तया वाणीवर
जीव माझा ॥१
एक एक ओळ
प्रबंध काव्याचा
बोध अध्यात्माचा
काठोकाठ ॥२
ग्रंथा ग्रंथातून
प्रेम ओसंडते
लाडक्यास घेते
कडेवर ॥३
अपार करुणा
जगत कारणा
माऊलीचे मना
ओघळते ॥४
विक्रांत करुणा
लहरीत ओला
जन्म फळा आला
कृपे तया ॥५
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने
http://kavitesathikavita.blogspot.com
जगातला तत्वनिष्ठ, बुद्धिवादी पण मानवतावादी चांगुलपणा - लहानपणी यालाच कृष्ण मानलं अन आता नास्तिक असले तरी शेवटी तो सखा असण्याशी मतलब ना; मग त्या नावाला हरकत कसली ?
||श्री||
तू मला आवडतोस हे मी खुपवेळा सांगितलंय.
न मागताही कितीतरीवेळा तुलाच तुझ्याकडे मागितलंय.
तू मला हवा आहेस माझा प्रिय सखा म्हणून
वाटतं, माझी सारी स्वप्न तूच फक्त घेशिल जाणून.
नकळत अंतर दूर करून अंतरंगी शिरलास तू!
माझ्या सार्या स्वप्नांमध्ये कधी भरून उरलास तू!
हातात असावा तुझा हात, चालताना चंद्रावरची पाऊलवाट.
चांदण्यांची फुले वेचताना , नकळत साद घालील पहाट.
ओंजळभर मोती आणू , समुद्रात मारुन बुडी.
उगवतीला वर येऊ, किरणांची करून शिडी.
वर्षासरींच्या धाग्यामध्ये मोत्याचा ओवेन सर.
वसंतातल्या भल्या पहाटे
साखरझोपेतून मजला
फुलपाखरांनी जागवावे
सुखद थंडसे पहाटवारे
सर्वांगाला स्पर्शुन जावे...
फुलांच्या धुंद मंद गंधाने
गायचे मी विसरलो असे
कोकिळाने गार्हाणे गावे
लटक्या रागात मग त्याने
डहाळीवर झुलत रहावे..
शेवाळल्या क्षीण प्रवाहाने
चाहुल माझी लागता मग
थबकून मजकडे पहावे
वरुन पान एक टपकता
चटकन पुढे निघुन जावे...
गार हिरव्या वृक्षांनी अन
ऊंच काळ्या कड्यांनी काही
हितगुज मेघांशी करावे
अवचित कंठातून माझ्या
गीत एक लकेरून जावे...
अश्या सुंदर नवथर वेळी