Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 7 June, 2020 - 03:41
सखा ज्ञानेश्वर
**********
सखा ज्ञानेश्वर
शब्दांचा सागर
तया वाणीवर
जीव माझा ॥१
एक एक ओळ
प्रबंध काव्याचा
बोध अध्यात्माचा
काठोकाठ ॥२
ग्रंथा ग्रंथातून
प्रेम ओसंडते
लाडक्यास घेते
कडेवर ॥३
अपार करुणा
जगत कारणा
माऊलीचे मना
ओघळते ॥४
विक्रांत करुणा
लहरीत ओला
जन्म फळा आला
कृपे तया ॥५
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने
http://kavitesathikavita.blogspot.com
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
श्री ज्ञानेश्वर माऊलीं चरणी
श्री ज्ञानेश्वर माऊलीं चरणी सर्वभावे वंदन...
शशांक >>>> Thank you .Its
शशांक >>>> Thank you .Its enough only if you read my poem here .