Submitted by गिरिश देशमुख on 18 December, 2010 - 13:51
वसंतातल्या भल्या पहाटे
साखरझोपेतून मजला
फुलपाखरांनी जागवावे
सुखद थंडसे पहाटवारे
सर्वांगाला स्पर्शुन जावे...
फुलांच्या धुंद मंद गंधाने
गायचे मी विसरलो असे
कोकिळाने गार्हाणे गावे
लटक्या रागात मग त्याने
डहाळीवर झुलत रहावे..
शेवाळल्या क्षीण प्रवाहाने
चाहुल माझी लागता मग
थबकून मजकडे पहावे
वरुन पान एक टपकता
चटकन पुढे निघुन जावे...
गार हिरव्या वृक्षांनी अन
ऊंच काळ्या कड्यांनी काही
हितगुज मेघांशी करावे
अवचित कंठातून माझ्या
गीत एक लकेरून जावे...
अश्या सुंदर नवथर वेळी
दवओल्या गवतावरून तेव्हा
अलगद माझ्या सखयाने यावे
ओळखीने हसत मंदसे
हात माझे हाती घ्यावे...
नजरेच्या गारुडात त्याच्या
देहभान मी विसरुन जावे
अस्तित्व माझे संपून जावे
तरीही भोवतीचे हे सारे
जीवन पुढे निघून जावे...
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
छान आहे कै च्या कै मध्ये का
छान आहे
कै च्या कै मध्ये का टाकली
धन्यवाद मुक्तेश्वर, काकाक
धन्यवाद मुक्तेश्वर,
काकाक मधून काढून ईकडे पोस्ट करतोय..! तिकडे by mistake पोस्ट झालेली होती.
गिरिश दादा, ही कविता स्त्री
गिरिश दादा,
ही कविता स्त्री च्या भुमिकेतून लिहिण्याचे कारण काय आसावे? सखा म्हण्जे कोण, मीत्र की प्रीयकर? बाकी कविता छान आहे, तुमचे निसःर्गा वर फार प्रेम दिसते !
इथे सखा, "सखया" म्हणजे
इथे सखा, "सखया" म्हणजे "मृत्यू", "जीवनाचा अटळ शेवट" (Inevitable End of Life) असा अर्थ अपेक्षीत आहे. आयुष्यातले शेवटचे क्षण निसर्गाच्या सानिध्यात, आनंदात घालवावेत अशी भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. मृत्यू महा बलाढ्य entity आहे, त्यासमोर आपण खुजे, हे दर्शविण्याकरिता, कविता स्त्री मुखी आहे. सूफी काव्यरचनांमध्ये आणि अगदी आपल्या मराठी संतकाव्यात ही ईश्वराला प्रीयकर/ सखा असे संबोधून भक्तीमय रचना निर्मिण्याची प्रथा आहे, त्याचेच थोडे अनुकरण !असो. अभिप्रायाबद्दल धन्यवाद!
सुरेखच, आवडली रच्याकने
सुरेखच, आवडली
रच्याकने गा-हाणे हा शब्द गार्हाणे (gaaRhaaNe) असा लिहता येइल.
गार्हाणे ! खरंच की.. धन्यवाद
गार्हाणे ! खरंच की..:) धन्यवाद विशाल !
अर्थ समजविल्या ने अजूनच सोपी
अर्थ समजविल्या ने अजूनच सोपी वाटली अणि छानही :). खूपच छान लिहिले आहे.
शेवाळल्या क्षीण प्रवाहाने
चाहुल माझी लागता मग
थबकून मजकडे पहावे
वरुन पान एक टपकता
चटकन पुढे निघुन जावे...
हे खूपच आवड्ले.
नजरेच्या गारुडात
नजरेच्या गारुडात त्याच्या
देहभान मी विसरुन जावे
अस्तित्व माझे संपून जावे
तरीही भोवतीचे हे सारे
जीवन पुढे निघून जावे...
हे कडवे छान आहे!
मृत्यू हा कुणाला एवढा का प्रीय असावा, की त्याला सखा म्हणावे आणि कविता रचावी? " सुंदर मृत्यू" असतो का?
जरू, प्रतिसादाबद्दल
जरू, प्रतिसादाबद्दल धन्स!
मृत्यू सुंदर असतो की नाही, ते मला नाही सांगता येणार, पण मृत्यू हे एक अटळ सत्य आहे, आणि सत्य हे सुंदर असते ! आपली मर्जी असो - नसो, आपल्याला मृत्यूला स्विकारणं भागच आहे. मग त्याचा स्विकार अगदी आनंदाने करू या ना !
क्या बात है!! गिरीशजी कविता
क्या बात है!! गिरीशजी कविता खुपच सुंदर!
सुरेख!
सुरेख!
गिरिश, तुमचा stand कळला ! वर
गिरिश, तुमचा stand कळला ! वर वर अगदी सोपी, साधी, सरळ, बाळबोध वाटणारी ही कविता प्रत्यक्षात किती खोल, अर्थपूर्ण आहे ! सुरुवातिला वाचली तेव्हा आवदली होतिच, पण गर्भित अर्थ कळल्यावर जास्ति आवडली, मनात खोल शिरून बसली. कवितेकडं बघायची एक नवी दृष्टी मिळाली. आता, प्रत्येक कविता वाचली किइ त्यात अजुन काहि अर्थ आहे का हे बघित जाइन. आभ्हार !
धन्स, जरू
धन्स, जरू
मरणात खरोखर जग जगते! सुंदर
मरणात खरोखर जग जगते! सुंदर कविता!
गिरीशदा, खूप छान कविता सहज
गिरीशदा, खूप छान कविता
सहज सोपी. पण मृत्यूच्या कल्पनेची पुसटही कल्पना आली नाही. त्यामुळे आणखीनच आवडली
खूप अर्थपूर्ण जीवन जगल्यानंतर नक्कीच असं मरायला आवडेल.
सुरेख कविता.
सुरेख कविता.
छानच..
छानच..
क्रांती, हर्षल, मुटेजी,
क्रांती, हर्षल, मुटेजी, मुक्ता धन्यवाद!