यावर्षी एकूण जमा झालेल्या देणगीतील रुपये २५,०००/- (पंचवीस हजार) फक्त एवढी देणगी सावली सेवा ट्रस्टला देवदासींच्या मुलांच्या शैक्षणिक खर्चासाठी देण्यात आली.
सदर देणगीतून ट्रस्टने मुलांच्या शाळा-कॉलेजेसचे शुल्क भरणे तसेच गणवेश, चपला, बूट, दप्तरे इत्यादींची खरेदी केली. त्यांच्या पावत्या त्यांनी पाठवल्या आहेत.
तसेच देणगीदार आणि सावली सेवा ट्रस्टला मदतीचा हात पुढे करणार्या सर्व स्वयंसेवकांचे आभार मानणारे पत्रही त्यांनी मुलांच्या प्रगतीच्या अहवालासकट पाठवले आहे.
१) आभारपत्र
नेहमीप्रमाणे यावर्षीही आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आपल्यापैकी काही मायबोलीकरांनी एकत्र येऊन सामाजिक उपक्रमासाठी मायबोलीवर आवाहन व घोषणा केली. या आवाहनातून वाचकांना त्यांच्या माहितीत असलेल्या, चांगले काम करणार्या गरजू व नोंदणीकृत सेवाभावी संस्थांची नावे, त्यांबद्दलची माहिती आणि त्या संस्थेची सध्या काय गरज आहे ते कळविण्यास सांगितले. थोड्याच दिवसांत आपल्याकडे ७ सेवाभावी संस्थांची माहिती व त्यांची निकड काय आहे याची एक मोठी यादीच जमा झाली. त्या माहितीची शहानिशा करून यादीतील संस्थांना मदत करण्यासाठी आपण मायबोलीवर एक जाहीर आवाहन केले.
कोंडल्याचे गाणे...
----
विशेष सुचना १:
एक लिंब झेलू बाई दोन लिंब झेलू---- या परंपरागत गायल्या जाणार्या भोंडल्याच्या गाण्यावरून प्रेरणा मिळाली...
चाल अर्थात त्याच गाण्याची 
माहित नसेल तर ऐकण्यासाठी मला वि पु करा... माझ्या मंजुळ आवाजात रेकॉर्ड करून पाठवेल 
----
एक तडका मारू बाई दोन तडके मारू
दोन तडके मारू बाई तीन तडके मारू
तीन तडके मारू बाई चार तडके मारू
चार तडके मारू बाई पाच तडके मारू
पाचा तडक्यांचा पुरवठाsss
माळ घाली कवीराजाला
कवीराजाची सुस्साट गाडी
येता जाता कविता पाडी...
कवितांच्या भाराने पिचली जनता
अरे अरे राजा बस तुझी सजा....
मिश्मी पर्वतरांगांमध्ये वसलेल्या लोअर देबांग व्हॅलीत मुख्यत्वे इदु लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. काहीसे कट्टर ! आजही आपल्या रुढी परंपरांना घट्ट चिकटून आहेत. अनेक भाषांप्रमाणे बोलीभाषा इदु लुप्त होण्याच्या मार्गावर आहे कारण त्याची लिपी नाहीये. शेती व पशुपालन हे मुख्य व्यवसाय. मिथुन,डुक्कर, कोंबड्या सारखे प्राणी पाळतात. भात, सरसो ही मुख्य पिकांबरोबर संत्री, केळी, अननस इ. फळांचं मुबलक प्रमाणावर उत्पादन होतं. निर्यातीसाठी दळणवळणाची पुरेशी सोय नाही. साठवणूक करायला फळ प्रक्रिया उद्योग नाहीत म्हणून पशू खाद्य विकत आणण्या ऐवजी उरलेलं अन्न व अतिरिक्त फळांचा उपयोग करतात.
शिवसेना आज सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. त्यानिमित्ताने थोडंसं....
------------------------------------------------------------------
नमस्कार मित्रांनो...
आपल्या व्यस्त दिनक्रमातून आणि बहुमूल्य वेळातून काही मिनीटे हवी आहेत मला... थोडी, आपण हे वाचण्यासाठी आणि थोडी, त्यावर चिंतन करण्यासाठी...
द्याल ही अपेक्षा आहे...
मी कोण आहे हे महत्वाचे नाही... मी तुमच्यापैकीच एक सामान्य मराठी माणूस आहे.. अगदी तुमच्यासारखाच..!
महाराष्ट्रावर जिवापाड प्रेम करणारा आणि उभ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची निस्सीम भक्ती करणारा असा एक सामान्य मराठी माणूस..!
नमस्कार मंडळी,
जून महिन्याच्या आगमनाबरोबरच नव्या शालेय वर्षाचे वेध समस्त विद्यार्थ्यांना, पालकांना व शिक्षकांना लागलेले असतात.
गेली दोन-तीन वर्षे आपल्यातील काही मायबोलीकर समाजाचे काही देणे फेडायचा अल्पसा प्रयत्न करत आहेत. मायबोलीच्या माध्यमातून एकत्र येऊन एका देवदासीं व गरीबवर्गातील मुलांच्या गरजू शाळेत मुलांना 'हसत-खेळत' स्पोकन इंग्लिश शिकवत आहेत.
भारतीय संस्कृती ही पर्यावरण विचारी आणि निसर्गसंवर्धक आहे. प्राचीन संस्कृत वाड्मयात त्याचे दाखले सर्वत्र मिळतात. वराहपुराणात सांगितलंय की -
यावत् भूमंडलात् धत्ते सशैलवनकाननम् ।
तावत् तिष्ठान्ति मेदिन्यां संतति, पुत्र पौतृकी ॥
म्हणजे जोपर्यंत या भूतलावर पर्वत, वने, आणि सरोवर आहेत तोपर्यंत तुम्ही, तुमची मुले व भावी पिढ्या सुखाने जगतील. हे वाक्य प्रश्नार्थक झालंय ना?
पाळणाघर
माझ्या भाच्याला ५ तास पाळणा घरात घातलाय ,,,, आणि तो खूप एन्जोय करतो ...पण माझ्या मुलीच्या बाबतीत माझ धाडस नाहीये होत पाळणा घरात घालायचं (मुलगी १ वर्षाची आहे)
घरी आजी-आजोबा आहेत बघायला … आणि मावशी येतात सकाळी १० - ५ ..
तुम्हाला आलेला पाळणाघराचा अनुभव इथे शेअर करा
या जगात अनेक गरीब, रोगाने ग्रासलेले, मानसिक अथवा शारीरिक दृष्ट्या आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करणारे, संकटग्रस्त, असे अनेक लोक आहेत ज्यांना आपल्यासारख्या धडधाकट माणसांच्या मदतीची आणि आधाराची गरज आहे. प्राणीसंवर्धन आणि निसर्गसंवर्धन हे सुद्धा आपले कर्तव्य आहे. आपण समाजाचे काही देणे लागतो हे लहानपणापासूनच मनावर बिंबविलेले असल्यामुळे खूप वेळा मनाची तगमग होते की आपण समाजातील वंचितांसाठी काहीही करत नाही (किंवा तगमग होते असे दाखवावे लागते!). भारत देश सोडून बाहेर आल्यानंतर पहिले की इथे रस्त्यावर, दुकानात अनेक ठिकाणी चॅरिटी बॉक्स ठेवलेले असतात.