श्याम मनोहर यांच्या लिखाणाचं गारूड माझ्यावर नक्की कधीपासून झालं ते काही नीट सांगता येणार नाही. कारण त्यांची पुस्तके माझ्या प्रत्यक्ष हातात येण्याच्याही खूप आधीपासून मला त्यांचे लेखन आकर्षित करत होते. वाचनाच्या बाबतीत साधारण एकसारखीच आवड असण्यार्या मित्रांच्या तोंडून ’श्याम मनोहर’ वाचच तू एकदा. प्रेमात पडशील. असं वारंवार सांगितलं जात होतं आणि तेही त्यांच्या शैलीविषयीच्या कुतुहलवर्धक उदाहरणांसह आणि वारेमाप कौतुकासह! पुस्तकांची नावे ऐकूनच अचंभित वाटायचे. काहीतरी अचाट अनुभूती या पुस्तकांत असणार हे नक्कीच जाणवले होते.
नुकतेच श्याम मनोहर यांचे "शंभर मी" हे पुस्तक वाचले. इतके दिवस पेपरमध्ये त्यावर आधारित कार्यक्रमाची जाहिरात बघायचे आणि कधी जाऊन बघावं वाटायचं. पण सहसा असे कार्यक्रम लांब आणि संध्याकाळी उशिरा असल्याने जाणं झालं नाही. पुस्तकाबद्दलच्या माझ्या भावना संमिश्र आहेत. सुसंगत, आदि-मध्य-अंत असलेल्या कथा किवा लेख वाचायची सवय असल्याने हा प्रकार नवीन वाटला. नाविन्यामुळे वाचत राहावं वाटलं. पण तरीही अर्धवट वाटतंय. प्रत्येक लेख हा कुणीतरी "मी" आहे आणि हा "मी" त्याचं/तिचं मनोगत किवा अनुभव किवा असच काही सांगत आहे. म्हणजे दिवसातले झोपण्याचे काही तास वगळता आपल्या मनात एक संवाद सतत चालू असतो.
'दिवाळी' या विषयावर श्याम मनोहर, श्री.दा. पानवलकर आणि भालचंद्र नेमाडे यांनी काय लिहिले असते असा विचार करता करता तयार झालेले हे गद्य विडंबन.
झक्कू हा पानवलकरांच्या 'अपील' या कथेचा कथानायक इथे थोड्या नव्या रुपात.
***
***