बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले...
तिचे निस्तेज डोळे अजूनही उघडेच होते. आजवर ज्यांच्यासाठी ती राबली, त्यांनी आज टिपं गाळण्यापलिकडे काहीही केलं नव्हतं. पण त्याचं तिला काहीच वाटत नव्हतं. कसली तरी अलौकिक शांतता तिच्या मुखमंडळावर पसरली होती. त्याला हे बघवेना. जाऊ दे, म्हणून त्याने पाठ फिरवली.
बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले....."
भक्तगणांनो, गणेशोत्सव तर सुरु झालाय. मन प्रसन्न करणाऱ्या गणेशमूर्ती घराघरात आणि सार्वजनिक मंडपात स्थानापन्न झाल्या आहेत. बाप्पाच्या मूर्तीकडे बघूनच मन आनंदित होते आणि एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा मिळते. तसेच बाप्पाला अर्पण करणारा प्रसाद आणि नैवैद्य यामुळे वातावरणातील गोडवा द्विगुणित झाला आहे. इतर मायबोलीकरांनासुद्धा तुमच्या घरातील बाप्पाचे दर्शन व्हावे आणि त्यांनासुद्धा नैवैद्याचा गोडवा अनुभवता यावा म्हणून या धाग्यावर तुम्ही तुमच्या घरातील बाप्पाचे फोटो तसेच बाप्पाला अर्पण करणाऱ्या प्रसादाचे आणि नैवैद्याचे फोटो द्यायचे आहेत. लवकरात लवकर फोटो टाका.
मायबोलीकरांनो, तुम्ही ऑनलाईन वृत्तपत्र नक्कीच वाचत असाल. त्यात एखादा बातमीचा मथळा ठळक अक्षरात लिहिलेला असतो आणि पुढे ती बातमी सविस्तर वाचण्यासाठी रीड मोअर ची लिंक दिलेली असते. बातमीचा मथळा वाचून असे वाटते कि यात काहीतरी विशेष असे किंवा एखादे रहस्य सांगितले असावे. प्रत्यक्षात मात्र ती बातमी अतिशय सामान्य, गमतीशीर किंवा असंबद्ध असते.
उदा. ऐश्वर्या रायने आराध्याबाबत घेतला महत्वपूर्ण निर्णय, ऐकून अभिषेक झाला चकित. रीड मोअर- ही आहे तिच्या नवीन ड्रेसची किंमत.
किंवा , श्रीकृष्णाचे ठसे सापडले तुळशीबागेत. रीड मोअर - ते प्लास्टिकचे चिकटवण्याचे ठसे होते.
हा आहे आपल्या सर्वांचा आवडता खेळ प्रकाशचित्रांचा झब्बू .
आजचा विषय - पूल ( Bridge)
रस्त्यामध्ये येणारे विविध प्रकारचे अ़डथळे पार करण्याकरिता लागणारी वास्तू म्हणजेच पूल होय. हे अडथळे नद्या, नाले, ओढे, दऱ्या खिंडी, खोलगट भाग, तलाव, सरोवरे, खाड्या, समुद्राचे भाग, आडवे जाणारे रहदारीचे रस्ते ,लोहमार्ग असे कोणत्याही प्रकारचे असू शकतात. तुम्हीही आजपर्यंत देश विदेशात अनेक पूलांवरून प्रवास केला असेल...काही काही पूलांवरचा प्रवास तर आज आपल्या रोजच्या जगण्याचा भाग झाला आहे...
मग अश्या काही देश ,विदेश, गावातील पूलांची छायाचित्र तुमच्याकडे असतील तर चला झब्बू खेळूयात ...
हा आहे आपल्या सर्वांचा आवडता खेळ प्रकाशचित्रांचा झब्बू
आजचा विषय आहे - प्रवेशद्वारावरील तोरण
मायबोलीकरांनो, हस्तकला स्पर्धेसाठी अजून एक विषय आम्ही घेऊन आलो आहोत, तो आहे काचेच्या बाटलीचे शोपीस. यात तुम्हाला एक रंगहीन किंवा रंगीत काचेची बाटली घ्यायची आहे. तिला वेगवेगळे रंग देऊन आणि सजावटीचे साहित्य वापरून सजवायचे आहे. एक शोपीस म्हणून तुम्ही या बाटलीचा उपयोग करू शकता. यात तुम्ही कृत्रिम किंवा खरी फुले किंवा इतर गोष्टी ठेऊ शकता.
सुरुवात करा मग साहित्य जमवायला आणि काचेच्या बाटलीचे शोपीस बनवायला.
हि मोठ्यांसाठी स्पर्धा आहे.
मायबोलीकरांनो, सकाळी पक्ष्यांच्या मंजुळ किलबिलाटाने उठणे कोणाला आवडणार नाही. सध्या जिकडे तिकडे इमारती उभ्या राहिल्यात त्यामुळे पक्ष्यांना घरटे बांधण्यासाठी योग्य अशी जागा मिळत नाही. यासाठी पक्षांसाठी कृत्रीम घरटी हि हस्तकला स्पर्धा आम्ही यावेळी आपणासाठी आणली आहे. यात सुतळीपासून , कार्डबोर्ड, किंवा लाकडी खोके वापरून पक्षांसाठी कृत्रीम घर तयार करायचे आहे. पक्षांसाठी तो एक निवारा होईल आणि त्यात ते आपले घरटे बांधू शकतील.
चला तर मग या हस्तकाला स्पर्धेत सहभागी होऊन पक्षीसंवर्धनासाठी एक वाटा उचलुया.
हि मोठ्यांसाठी स्पर्धा आहे.
मायबोलीकरांनो, शाळेत असताना असे चित्र आपण नक्कीच काढले असेल ज्यात शिक्षक टेबलवर काही वस्तूंची मांडणी करायचे आणि आपल्याला ते बघून त्याचे चित्र काढायला सांगायचे. या स्पर्धेचा हाच विषय आहे यात तुम्ही तुमच्या पुढे टेबलवर काही वसूंची मांडणी करायची आहे. उदा. फुलदाणी, थाळी, बाटली, छोटे मडके, फळे असे काहीही. ते बघून त्याचे चित्र तुम्ही काढायचे आहे आणि धागा काढून त्यात पोस्ट करायचे आहे.
चला तर मग, शाळेतील ते बालपण आपण परत जगूया.
हि मोठ्यांसाठी स्पर्धा आहे.