मायबोलीकरांनो, सकाळी पक्ष्यांच्या मंजुळ किलबिलाटाने उठणे कोणाला आवडणार नाही. सध्या जिकडे तिकडे इमारती उभ्या राहिल्यात त्यामुळे पक्ष्यांना घरटे बांधण्यासाठी योग्य अशी जागा मिळत नाही. यासाठी पक्षांसाठी कृत्रीम घरटी हि हस्तकला स्पर्धा आम्ही यावेळी आपणासाठी आणली आहे. यात सुतळीपासून , कार्डबोर्ड, किंवा लाकडी खोके वापरून पक्षांसाठी कृत्रीम घर तयार करायचे आहे. पक्षांसाठी तो एक निवारा होईल आणि त्यात ते आपले घरटे बांधू शकतील.
चला तर मग या हस्तकाला स्पर्धेत सहभागी होऊन पक्षीसंवर्धनासाठी एक वाटा उचलुया.
हि मोठ्यांसाठी स्पर्धा आहे.
स्पर्धेचे नियम व अटी -
१. 'मायबोली गणेशोत्सव २०२३' या ग्रुपमध्ये नवीन धागा काढून त्यात फोटो द्यावे. 'मायबोली गणेशोत्सव २०२३' हा ग्रुप १९ सप्टेंबर २०२३ रोजी उघडेल.
२. धाग्याचे नाव हस्तकला स्पर्धा-१ - मोठा गट - पक्ष्यांची घरटी - मायबोली आयडी किंवा खरे नाव (ऐच्छिक- जर प्रशस्तिपत्रकावर खरे नाव पाहिजे असेल तर ) अशा प्रकारे द्यावे.
३. कलाकृती बनवतानाचे दोन आणि बनवून झाल्यावर एक असे किमान तीन फोटो द्यायचे आहे. तसेच वापरलेल्या साहित्याचा उल्लेख करायचा आहे.
४. कोणीही कितीही प्रवेशिका देऊ शकतो.
५. प्रवेशिकेची अंतिम तारीख अमेरिकेतील पश्चिम किनाऱ्यावरील प्रमाणवेळेनुसार (पॅसिफिक टाइमझोन) २८ सप्टेंबर २०२३ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत (भारतीय वेळेनुसार २९ सप्टेंबर २०२३ दुपारी १२:३० वाजेपर्यंत )
|| गणपती बाप्पा मोरया ||
छान उपक्रम!
छान उपक्रम!
छान उपक्रम!
छान उपक्रम!
आम्ही खोक्याला गोल भोक पाडून ते बाल्कनीत ऊंचावर अडकून ठेवायचो. मुद्दाम त्याला कोणताही रंग किंवा सजावट केलेली नसायची कारण तिला काहीतरी वेगळ वाटून ते येणार नाही असे वाटायचे. चिमणी तिचा गवत-चारा-कापूस आणून त्यात घरटे करायची.