मायबोलीकरांनो, हस्तकला स्पर्धेसाठी अजून एक विषय आम्ही घेऊन आलो आहोत, तो आहे काचेच्या बाटलीचे शोपीस. यात तुम्हाला एक रंगहीन किंवा रंगीत काचेची बाटली घ्यायची आहे. तिला वेगवेगळे रंग देऊन आणि सजावटीचे साहित्य वापरून सजवायचे आहे. एक शोपीस म्हणून तुम्ही या बाटलीचा उपयोग करू शकता. यात तुम्ही कृत्रिम किंवा खरी फुले किंवा इतर गोष्टी ठेऊ शकता.
सुरुवात करा मग साहित्य जमवायला आणि काचेच्या बाटलीचे शोपीस बनवायला.
हि मोठ्यांसाठी स्पर्धा आहे.
स्पर्धेचे नियम व अटी -
१. 'मायबोली गणेशोत्सव २०२३' या ग्रुपमध्ये नवीन धागा काढून त्यात फोटो द्यावे. 'मायबोली गणेशोत्सव २०२३' हा ग्रुप १९ सप्टेंबर २०२३ रोजी उघडेल.
२. धाग्याचे नाव हस्तकला स्पर्धा-२ - मोठा गट - काचेच्या बाटलीचे शोपीस- मायबोली आयडी किंवा खरे नाव (ऐच्छिक- जर प्रशस्तिपत्रकावर खरे नाव पाहिजे असेल तर ) अशा प्रकारे द्यावे.
३. कलाकृती बनवतानाचे दोन आणि बनवून झाल्यावर एक असे किमान तीन फोटो द्यायचे आहे. तसेच वापरलेल्या साहित्याचा उल्लेख करायचा आहे.
४. कोणीही कितीही प्रवेशिका देऊ शकतो.
५. प्रवेशिकेची अंतिम तारीख अमेरिकेतील पश्चिम किनाऱ्यावरील प्रमाणवेळेनुसार (पॅसिफिक टाइमझोन) २८ सप्टेंबर २०२३ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत (भारतीय वेळेनुसार २९ सप्टेंबर २०२३ दुपारी १२:३० वाजेपर्यंत )
|| गणपती बाप्पा मोरया ||
Interesting
Interesting
फक्त कोणी दारूची बाटली नका वापरू प्लीज..
यामध्ये फक्त काचेची बाटली
यामध्ये फक्त काचेची बाटली वापरायची आहे का? काचेची जार चालेल का?
जुइ चालेल बहुतेक. आता संयोजक
जुइ चालेल बहुतेक. आता संयोजक सांगतीलच पण मला वाटतय ९९% चालेल म्हणुन.
काचेची जार चालेल.
काचेची जार चालेल.
ही स्पर्धा interesting वाटतेय
ही स्पर्धा interesting वाटतेय. २-३ आहेत खरे सजवलेल्या बाटल्या घरात पण बहूतेक त्यांचे रंगवताना काढलेले फोटो नसतील.
जमले तर करते १-२ बाटल्या.
कोणत्याही बाटल्या चालतील ना? ज्यूस आणि दारूच्या असतील घरी.
ज्यूसच्या चालतील, दारूच्या
ज्यूसच्या चालतील, दारूच्या नको.
मी हे २-३ वर्षापुर्वी केले
मी हे २-३ वर्षापुर्वी केले होते….