मायबोली गणेशोत्सव २०२३

चित्रकला स्पर्धा-१ - मोठा गट - 'वाहतूक सुरक्षा आणि हेल्मेटचा वापर'

Submitted by संयोजक on 17 September, 2023 - 23:47

मायबोलीकरांनो, वाहतुकीमध्ये दुचाकीवरून जाताना अपघात झाला तर हेल्मेट न वापरल्यामुळे होणाऱ्या परिणामांची तीव्रता जास्त असते. प्रसंगी जीवसुद्धा जाऊ शकतो. हेल्मट जर वापरले तर हाच जाणारा जीव वाचू शकतो. दुचाकीवर बसताना जर हेल्मेट घालायचे टाळावेसे वाटले तर घरी आपले कुटुंब आपली वाट बघत आहे हे लक्षात घ्या आणि हेल्मेटचा वापर अनिवार्य आहे हे मनाशी पक्के करा. हाच या चित्रकला स्पर्धेचा विषय आहे, 'वाहतूक सुरक्षा आणि हेल्मेटचा वापर'. यात तुम्हाला हेल्मेटच्या वापराचे महत्व सांगणारे चित्र काढून ते रंगवायचे आहे. समर्पक असे घोषवाक्य सुद्धा तुम्ही देऊ शकता.

विषय: 

हस्तकला उपक्रम-२ छोटा गट - पणती सजवणे

Submitted by संयोजक on 17 September, 2023 - 12:07

मायबोलीकरांनो, दिवाळी हा दिव्यांचा सणआहे आणि तो आपण घराघरात दिवे लावून साजरा करत असतो. तसेच देवाच्यापुढे सुद्धा आपण दिवा, पणती लावत असतो. मांगल्याचे ते एक प्रतीक असते. अशीच पणती सजवण्याचा उपक्रम या वेळी संयोजक टीम छोट्या दोस्तांसाठी घेऊन आली आहे. यात मायबोलीकरांच्या लहान मुलांना एक न रंगविलेली किंवा एकाच रंगात रंगवलेली पणती घ्यायची आहे. तिला आकर्षक असे रंग देऊन किंवा सजावटीचे साहित्य उदा. मणी, काच, टिकल्या असे चिकटवून तिला सजवायचे आहे. सजावण्याआधीचा आणि सजावट पूर्ण झाल्याचा असे दोन फोटो धाग्यात द्यायचे आहेत.
चला लवकर साहित्य गोळा करा आणि पणती सजवायला घ्या.

विषय: 

हस्तकला उपक्रम-१ छोटा गट -पताका बनविणे

Submitted by संयोजक on 17 September, 2023 - 10:25

मित्रांनो, मंडपामध्ये तसेच, गणपतीच्या सजावटीसाठी पताकांचा वापर होत असतो. वेगवेगळ्या रंगांच्या आणि वेगवेगळी नक्षीकाम असलेल्या पताका सगळ्यांचे लक्ष वेधून घेत असतात. अशाच रंगीबेरंगी पताका बनवण्याचा उपक्रम आम्ही घेऊन आलो आहोत मायबोलीकरांच्या छोट्या दोस्तांसाठी. यामध्ये वेगवेगळी नक्षी असलेल्या पताका तुम्हाला बनवायच्या आहेत आणि त्यांचे फोटो द्यायचे आहेत. तर चला लागा कामाला पताका बनवण्याच्या .

हा उपक्रम आहे स्पर्धा नाही.

विषय: 

चित्रकला उपक्रम-२ छोटा गट -वृक्षारोपण व संवर्धन

Submitted by संयोजक on 17 September, 2023 - 07:38

लोकहो, झाडांचे जंगल कमी होत होत आता काँक्रीटचे जंगल वाढायला लागले आहे. वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा होणार नाश आणि त्यामुळे वातावरणावर होणारे परिणाम आपण अनुभवतो आहोत. अनियमित पाऊस, वाढलेले उष्णतेचे प्रमाण, प्रदूषित हवेमुळे आपल्या आरोग्यावर होणारा परिणाम या सर्वांना आपण सामोरे जात आहोत. या सर्वांवर वृक्षसंवर्धन हा एक उत्तम उपाय आहे. वृक्षसंवर्धनाचे महत्व लहान मुलांना समजावे म्हणून संयोजक टीम मायबोलीकरांच्या छोट्यांसाठी यावेळी वृक्षारोपण व संवर्धन हा चित्रकलेचा आणखी एक उपक्रम घेऊन आली आहे. यात बाळगोपाळांना वृक्षारोपण व संवर्धन याचे महत्व सांगणारे चित्र काढून रंगवायचे आहे.

विषय: 

लेखन उपक्रम-२ - एकारंभा अनंतार्था (शशक पूर्ण करा )-१

Submitted by संयोजक on 15 September, 2023 - 17:11

मायबोलीकरांनो, या धाग्याच्या शीर्षकातच सगळे आहे. दरवर्षी हमखास मनोरंजन करणारा उपक्रम म्हणजे शशक पूर्ण करा. जुन्या जाणत्या मायबोलीकरांना याबद्दल माहित असेलच पण नवीन मायबोलीकरांसाठी आम्ही याच्या सूचना देतोय. यात एका गोष्टीची सुरुवात आम्ही करून देणार आहोत आणि तुम्हाला ती शशक तुमच्या कल्पनाशक्तीने पुढे नेत पूर्ण करायची आहे आणि कथेला योग्य असे शीर्षक द्यायचे आहे. कथेची सुरुवात खालीलप्रमाणे आहे.

" बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले....."

हा उपक्रम आहे स्पर्धा नाही.

विषय: 

लेखन उपक्रम-१ - मी ...... झालो/झाले तर.(तुमच्या कल्पनेतील व्यक्ती )

Submitted by संयोजक on 15 September, 2023 - 16:58

लोकहो, आपल्या आयुष्यात आपण अनेक तर्हेच्या व्यक्ती पाहिलेल्या असतात आणि त्या व्यक्ती करत असलेली कामेसुद्धा. अशी व्यक्ती कोणीही असू शकते, आपले शिक्षक, प्राचार्य, आपण काम करत असलेल्या कंपनीचा मालक किंवा समाजातील एखाद्या पदावर असलेली व्यक्ती. अशा व्यक्तींचे काम पाहताना कधी कधी असे वाटते कि "अरे, याने जर असे केले असते तर किती बरे झाले असते किंवा याच्या जागी जर मी असतो/असते तर असे केले असते. शाळेत असताना तर प्रत्येकाने मी प्राध्यापक झालो तर किंवा अशा संबधी निबंध नक्कीच लिहिला असेल. या उपक्रमात सुद्धा हेच करायचे आहे.

विषय: 

लेखनस्पर्धा -२ - फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश ..

Submitted by संयोजक on 15 September, 2023 - 16:40

लोकहो, साधे, सरळ, सुरळीत, अडचणी नसलेले जीवन म्हणजे मिठाशिवाय बनवलेले चवहीन जेवण असते. असे जीवन जगण्यात मजा नसते. आयुष्यात येणारे एक एक अडथळे पार करत, येणाऱ्या कठीण प्रसंगांना सामोरे जात त्यांच्यावर मात करणे हाच सुखी आणि समाधानी जीवनातील एक भाग असतो. परंतु कधी कधी आपल्या आयुष्यात असे काही पेचप्रसंग उभे राहतात ज्याच्यामध्ये आपण पूर्णतः अडकून जातो. त्याच्यातून बाहेर पडायचा प्रयत्न केला तर गुंता अधिकच वाढत जातो. आता यातून आपली सुटका नाही असे वाटून आपण हताश होतो पण तेवढ्यात अशी काही घटना घडते किंवा अशी काही परिस्थिती निर्माण होते ज्याच्यामुळे त्या गुंत्यातील एक एक धागा अलगद सुटायला लागतो.

विषय: 

लेखनस्पर्धा -१ - स्त्री असणं म्हणजे ..

Submitted by संयोजक on 15 September, 2023 - 15:59

आई, मुलगी, बहीण, पत्नी, प्रेयसी व मैत्रिण अशा निरनिराळ्या रूपात आपण स्त्रीला ओळखतो खरे; परंतु, स्त्रीचे रूप एवढ्यापुरतेच मर्यादित नाही तर स्त्रीत्वाची व्याख्या याहीपेक्षा अधिक मोठी आहे. परंतु, पुरुषप्रधान संस्कृतीच्या प्रभावामुळे ती कदाचित आपल्यापैकी अनेक पुरुष आणि खुद्द स्त्रियांनाही माहिती नसेल.
,मग मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुमच्या दृष्टीने स्त्री ची व्याख्या काय? स्त्री असणं म्हणजे काय? तुम्ही उदाहरण देऊन सुद्धा सांगू शकता... मग ती तुमची पत्नी, आई, बहीण, मैत्रीण, प्रेयसी किंवा ऑफिसमधील सहकारी असू शकते.
चला तर मग उचला लेखणी आणि मांडा तुमच्या मनातले विचार...

विषय: 

पाककृती स्पर्धा क्र ४- चविष्ट आणि पौष्टिक पेय

Submitted by संयोजक on 15 September, 2023 - 15:33

लोकहो, जसजशी वातावरणात उष्णता वाढत जाते तसतशी आपली पावले शीतपेयांच्या दुकानांकडे, रसविक्रेत्यांकडे वळू लागतात. यात तहानलेल्या व्यक्ती आपल्या आरोग्यास हानिकारक आहे हे माहित असूनही सर्रास शीतपेय पितात. तसेच कृत्रिम रंग वापरलेले फळांचे रस पितात. यांना पर्याय म्हणून यावेळी संयोजक टीम घेऊन आली आहे आरोग्यदायक चविष्ट आणि पॊष्टिक असे पेय बनवण्याची स्पर्धा. यात असे पेय बनवायचे आहे ज्यात किमान दोन पॊष्टिक घटक असतील. हे पेय बनवण्याची कृती तर तुम्हाला लिहायचीच आहे पण यात वापरलेल्या पॊष्टिक घटकांमुळे शरीरास काय फायदा होतो तेसुद्धा लिहायचे आहे.

विषय: 

पाककृती स्पर्धा ३ - Milets किंवा भरड धान्य वापरून पाककृती. (गहू, तांदूळ व्यतिरिक्त)

Submitted by संयोजक on 15 September, 2023 - 13:51

संयुक्त राष्ट्राकडून २०२३ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष’ (इंटरनॅशनल इअर ऑफ मिलेट्स) म्हणून जाहीर करण्यात आले आहे.
ऊर्जा व पोषण देणाऱ्या ‘मिलेट’ वा भरड धान्यांपासून मिळणारे आरोग्यसंबंधीचे फायदे खूप असल्याने त्याविषयी जनजागृती होणे आवश्यक आहे. भविष्यात धान्याचा तुटवडा पडू नये म्हणून जगभरातच भरड धान्यांचे उत्पादन वाढवण्याचे प्रयत्न आणि प्रक्रिया करण्यात येणार आहे.
त्यानिमित्ताने आम्ही घेऊन आलो आहोत ...

पाककृती स्पर्धा- Milets किंवा भरड धान्य वापरून पाककृती. (गहू, तांदूळ व्यतिरिक्त)

विषय: 

Pages

Subscribe to RSS - मायबोली गणेशोत्सव २०२३