हस्तकला उपक्रम-१ छोटा गट -पताका बनविणे

Submitted by संयोजक on 17 September, 2023 - 10:25

मित्रांनो, मंडपामध्ये तसेच, गणपतीच्या सजावटीसाठी पताकांचा वापर होत असतो. वेगवेगळ्या रंगांच्या आणि वेगवेगळी नक्षीकाम असलेल्या पताका सगळ्यांचे लक्ष वेधून घेत असतात. अशाच रंगीबेरंगी पताका बनवण्याचा उपक्रम आम्ही घेऊन आलो आहोत मायबोलीकरांच्या छोट्या दोस्तांसाठी. यामध्ये वेगवेगळी नक्षी असलेल्या पताका तुम्हाला बनवायच्या आहेत आणि त्यांचे फोटो द्यायचे आहेत. तर चला लागा कामाला पताका बनवण्याच्या .

हा उपक्रम आहे स्पर्धा नाही.

उपक्रमाचे नियम व अटी -
१. 'मायबोली गणेशोत्सव २०२३' या ग्रुपमध्ये नवीन धागा काढून त्यात लेखन करावे. 'मायबोली गणेशोत्सव २०२३' हा ग्रुप १९ सप्टेंबर २०२३ रोजी उघडेल.
२. धाग्याचे नाव हस्तकला उपक्रम-१ - छोटा गट - पताका बनविणे - मायबोली आयडी - बाळगोपाळांचे नाव असे द्यावे
३. हा उपक्रम फक्त मायबोलीकरांच्या मुलामुलींकरता आहे.
४. वयोगट - 15 वर्षे पर्यंत.
५. कोणीही कितीही प्रवेशिका देऊ शकतो.
४ . प्रवेशिकेची अंतिम तारीख अमेरिकेतील पश्चिम किनाऱ्यावरील प्रमाणवेळेनुसार (पॅसिफिक टाइमझोन) २८ सप्टेंबर २०२३ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत (भारतीय वेळेनुसार २९ सप्टेंबर २०२३ दुपारी १२:३० वाजेपर्यंत )

|| गणपती बाप्पा मोरया ||

विषय: 
Groups audience: 
- Private group -
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्रिकोणीच नाही तर आयताकार, अर्धगोल किंवा पताकाच्या कडा नक्षीनुसार कापून सुद्धा चालतील. तोरण सुद्धा चालेल.