लोकहो, जसजशी वातावरणात उष्णता वाढत जाते तसतशी आपली पावले शीतपेयांच्या दुकानांकडे, रसविक्रेत्यांकडे वळू लागतात. यात तहानलेल्या व्यक्ती आपल्या आरोग्यास हानिकारक आहे हे माहित असूनही सर्रास शीतपेय पितात. तसेच कृत्रिम रंग वापरलेले फळांचे रस पितात. यांना पर्याय म्हणून यावेळी संयोजक टीम घेऊन आली आहे आरोग्यदायक चविष्ट आणि पॊष्टिक असे पेय बनवण्याची स्पर्धा. यात असे पेय बनवायचे आहे ज्यात किमान दोन पॊष्टिक घटक असतील. हे पेय बनवण्याची कृती तर तुम्हाला लिहायचीच आहे पण यात वापरलेल्या पॊष्टिक घटकांमुळे शरीरास काय फायदा होतो तेसुद्धा लिहायचे आहे.
तर चला पटापट साहित्य घ्या आणि बनवायला सुरुवात करा आरोग्यदायी चविष्ट आणि पॊष्टिक पेय.
ही स्पर्धा आहे.
स्पर्धेचे नियम व अटी -
१. 'मायबोली गणेशोत्सव २०२३' या ग्रुपमध्ये नवीन पाककृती धागा काढून त्यात पाककृती लिहावी. 'मायबोली गणेशोत्सव २०२३' हा ग्रुप १९ सप्टेंबर २०२३ रोजी उघडेल.
२. धाग्याचे नाव पाककृती स्पर्धा-१ - आरोग्यदायी पौष्टिक पेय - पदार्थाचे नाव- मायबोली आयडी किंवा खरे नाव (ऐच्छिक- जर प्रशस्तिपत्रकावर खरे नाव पाहिजे असेल तर ) अशा प्रकारे द्यावे.
३. पदार्थ बनवतानाचे दोन, यात साहित्याचा फोटोसुद्धा देऊ शकता आणि पदार्थ तयार झाल्यानंतरचा एक असे किमान तीन फोटो द्यायचे आहेत.
४. खाद्यपदार्थाचे नाव आधी द्यावे मग खाली साहित्य आणि पाककृती लिहावी.
५. पेय शाकाहारी असावे, मद्य किंवा त्याचा अंश असलेले कोणतेही पेय चालणार नाही . पेय बनवण्यासाठी लागणारे सगळे साहित्य स्पष्टपणे नमूद करावे.
६. कोणीही कितीही पाककृती देऊ शकतो.
७. प्रवेशिकेची अंतिम तारीख अमेरिकेतील पश्चिम किनाऱ्यावरील प्रमाणवेळेनुसार (पॅसिफिक टाइमझोन) २८ सप्टेंबर २०२३ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत (भारतीय वेळेनुसार २९ सप्टेंबर २०२३ दुपारी १२:३० वाजेपर्यंत )
पाककलापटू माबोकरांच्या चविष्ट प्रवेशिकांची प्रतीक्षा आहे.
|| गणपती बाप्पा मोरया ||
वाह, ही स्पर्धा सोपी दिसतेय,
वाह, ही स्पर्धा सोपी दिसतेय,
आजवर कधी पाकृ स्पर्धेत भाग घेतला नाही.
पण मनावर घेतले तर एखादे पेय बनवूच शकतो
रंपा चालेल का नाही ते पण लिहा
रंपा चालेल का नाही ते पण लिहा ओ यात.
चविष्ट पण हवं, पौष्टिक पण हवं
चविष्ट पण हवं, पौष्टिक पण हवं. कसं जमायचं -- आखुडशिंगी बहुदुधी!