लेखनस्पर्धा -१ - स्त्री असणं म्हणजे ..

Submitted by संयोजक on 15 September, 2023 - 15:59

आई, मुलगी, बहीण, पत्नी, प्रेयसी व मैत्रिण अशा निरनिराळ्या रूपात आपण स्त्रीला ओळखतो खरे; परंतु, स्त्रीचे रूप एवढ्यापुरतेच मर्यादित नाही तर स्त्रीत्वाची व्याख्या याहीपेक्षा अधिक मोठी आहे. परंतु, पुरुषप्रधान संस्कृतीच्या प्रभावामुळे ती कदाचित आपल्यापैकी अनेक पुरुष आणि खुद्द स्त्रियांनाही माहिती नसेल.
,मग मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुमच्या दृष्टीने स्त्री ची व्याख्या काय? स्त्री असणं म्हणजे काय? तुम्ही उदाहरण देऊन सुद्धा सांगू शकता... मग ती तुमची पत्नी, आई, बहीण, मैत्रीण, प्रेयसी किंवा ऑफिसमधील सहकारी असू शकते.
चला तर मग उचला लेखणी आणि मांडा तुमच्या मनातले विचार...

ही स्पर्धा आहे.

स्पर्धेचे नियम व अटी -
१. 'मायबोली गणेशोत्सव २०२३' या ग्रुपमध्ये नवीन धागा काढून त्यात लेखन करावे. 'मायबोली गणेशोत्सव २०२३' हा ग्रुप १९ सप्टेंबर २०२३ रोजी उघडेल.
२. धाग्याचे नाव लेखन स्पर्धा-१ - मायबोली आयडी किंवा खरे नाव (ऐच्छिक- जर प्रशस्तिपत्रकावर खरे नाव पाहिजे असेल तर ) अशा प्रकारे द्यावे.
६. कोणीही कितीही प्रवेशिका देऊ शकतो.
७. प्रवेशिकेची अंतिम तारीख अमेरिकेतील पश्चिम किनाऱ्यावरील प्रमाणवेळेनुसार (पॅसिफिक टाइमझोन) २८ सप्टेंबर २०२३ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत (भारतीय वेळेनुसार २९ सप्टेंबर २०२३ दुपारी १२:३० वाजेपर्यंत )

|| गणपती बाप्पा मोरया ||

विषय: 
Groups audience: 
- Private group -
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा विषय सुद्धा सुंदर आहे...
दोन्ही विषय यावेळी छान आहेत.
लिहायला आणि वाचायला दोन्ही आवडेल ..

तरी पुरुषांना स्त्री आणि स्त्रियांना पुरुष हा विषय असायला हवा होता Happy

खूप शिकायला मिळेल. अनेकांच्या प्रतिमेत स्त्रीची मूर्ती कशी असेल, कोणाचे काय अनुभव असतील - सकारात्मक अथवा कसेही. वाचायला खूप आवडेल.

छान आहे उपक्रम.
सकारात्मक म्हणजे आईवर निबंध लिहा.

>>>>>>>>>>सकारात्मक म्हणजे आईवर निबंध लिहा.
नकारात्मक म्हणजे सासूवर लिहा Wink जस्ट किडिंग.

Lol .... मस्त!!
आचार्य लिहा मस्त मस्त. सगळेजण या वर्षी भरघोस प्रतिसाद द्या. मेजवानी मिळू द्यात.

विषय नवा नाही पण तरीही प्रत्यक्ष अनुभव वाचायला आवडतील व पाहु काही वेगळे विचार वाचायला मिळतात का.

>>> मग मित्रांनो...तुमच्या दृष्टीने स्त्री ची व्याख्या काय? स्त्री असणं म्हणजे काय? तुम्ही उदाहरण देऊन सुद्धा सांगू शकता... मग ती तुमची पत्नी, आई, बहीण, मैत्रीण, प्रेयसी किंवा ऑफिसमधील सहकारी असू शकते.

म्हणजे फक्त पुरूष आयडीजनीच लिहायचंय का?

मग ती तुमची पत्नी, आई, बहीण, मैत्रीण, प्रेयसी किंवा ऑफिसमधील सहकारी असू शकते.

म्हणजे फक्त पुरूष आयडीजनीच लिहायचंय का?>>> स्त्रियांना पत्नी, आई, बहीण, मैत्रीण, प्रेयसी किंवा ऑफिसमधील सहकारी असू शकत नाहीत का?

इंडिआला १९ तारीख सुरु झाली की मला वाटतं ग्रुप उघडेल. आजच २ धागे टाकेन मी Happy एकाच वेळी सुचलं कीच लिहीता येते. नंतर रिफाईन करत बसताना फार आर्टिफिशिअल वाटते. तेव्हा 'अनरिफाइन्ड धागे' गोड मानून घ्या. आधी आमच्या टिकल्या होउन जाऊ देत मग सुतळी व भुईनळे येतीलच.

"मग मित्रांनो..." अशी सुरुवात होती हो.>>> फारच बायनरी विचार झाला हा. स्वतः ला मित्र असं आयडेंटिफाय करणाऱ्या मैत्रिणींनी लिहायचं नाही का? सर्वनामांमध्ये गुंतून कशाला राहायचं.

>>>>>स्वतः ला मित्र असं आयडेंटिफाय करणाऱ्या मैत्रिणींनी लिहायचं नाही का? सर्वनामांमध्ये गुंतून कशाला राहायचं.
होय, जेंडर फ्लुइडिटी हा मुद्दा सार्थ आहे.

यू आर चो च्वीट, धाग्यावेताळ! Happy
पण तुम्हाला प्रश्न कळलेला दिसत नाही. असू दे, कळायचा त्यांना कळला आणि उत्तरही मिळालं.

यू आर चो च्वीट, धाग्यावेताळ! Happy>> थँक्यू. आता यावर गालावर गुलाब स्मायली देणं क्रमप्राप्त आहे Blush
कळायचा त्यांना कळला आणि उत्तरही मिळालं >>> संयोजकांनी केलेला बदल पाहता तुमच्या प्रश्नाचं त्यांनी माझ्यापेक्षा काय वेगळं इंटरप्रीटेशन काढलं हा संशोधनाचा विषय आहे. असो.

अमितव, तेच तर
पुरुषांमध्ये फक्त पुरुषोत्तम असेल तरच मर्यादा
पण बायकांमध्ये सरसकट, बोले तो बाई डिफॉल्ट

नाही S ओ SS नाही SS...
अमर्याद तर तो असतो....
मर्यादा फक्त तिला !!
लेख लिहायला तिने घेतला तर आपसुक मर्यादा आलीच. कारण कुठलाही लेख लेखणीने (ती लेखणी = तिने) लिहिताना शाई संपेपर्यन्तची मर्यादा आहेच. ह्याउलट कुठलाही लेख लिहायला कीबोर्डने (तो कीबोर्ड = त्याने) सुरुवात केली तर अमर्याद बाइट्सवाले लिखाण सहज शक्य असते. Light 1

कीबोर्ड च्या कीज तुटल्या तर? फाईल corrupt झाली तर, battery संपली तर, cloud hack झाला तर, data loss झाला तर?

मर्यादाच मर्यादा
शाई संपली की लगेच आणता येते..