लेखनस्पर्धा -२ - फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश ..

Submitted by संयोजक on 15 September, 2023 - 16:40

लोकहो, साधे, सरळ, सुरळीत, अडचणी नसलेले जीवन म्हणजे मिठाशिवाय बनवलेले चवहीन जेवण असते. असे जीवन जगण्यात मजा नसते. आयुष्यात येणारे एक एक अडथळे पार करत, येणाऱ्या कठीण प्रसंगांना सामोरे जात त्यांच्यावर मात करणे हाच सुखी आणि समाधानी जीवनातील एक भाग असतो. परंतु कधी कधी आपल्या आयुष्यात असे काही पेचप्रसंग उभे राहतात ज्याच्यामध्ये आपण पूर्णतः अडकून जातो. त्याच्यातून बाहेर पडायचा प्रयत्न केला तर गुंता अधिकच वाढत जातो. आता यातून आपली सुटका नाही असे वाटून आपण हताश होतो पण तेवढ्यात अशी काही घटना घडते किंवा अशी काही परिस्थिती निर्माण होते ज्याच्यामुळे त्या गुंत्यातील एक एक धागा अलगद सुटायला लागतो. हळू हळू अनपेक्षितरित्या आपण त्यातून बाहेर पडतो आणि सुटकेचा निश्वास सोडतो. अशाच काही प्रसंगाबद्दल तुम्हाला लिहायचे आहे. तुम्ही अशा पेचप्रसंगातून कसे बाहेर पडून मोकळ्या आकाशात श्वास घेतलात ते.

हे वाचतानाच तुमच्या डोक्यात भूतकाळातील गोष्टी तरळल्या असतील. मग वाट कसली बघताय. लेखणी घ्या आणि सुरुवात करा अशा प्रसंगाबद्दल लिहायला.

हि स्पर्धा आहे.

स्पर्धेचे नियम व अटी -
१. 'मायबोली गणेशोत्सव २०२३' या ग्रुपमध्ये नवीन धागा काढून त्यात लेखन करावे. 'मायबोली गणेशोत्सव २०२३' हा ग्रुप १९ सप्टेंबर २०२३ रोजी उघडेल.
२. धाग्याचे नाव लेखन स्पर्धा-२ - फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश ..- मायबोली आयडी किंवा खरे नाव (ऐच्छिक- जर प्रशस्तिपत्रकावर खरे नाव पाहिजे असेल तर ) अशा प्रकारे द्यावे.
६. कोणीही कितीही प्रवेशिका देऊ शकतो.
७. प्रवेशिकेची अंतिम तारीख अमेरिकेतील पश्चिम किनाऱ्यावरील प्रमाणवेळेनुसार (पॅसिफिक टाइमझोन) २८ सप्टेंबर २०२३ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत (भारतीय वेळेनुसार २९ सप्टेंबर २०२३ दुपारी १२:३० वाजेपर्यंत )

|| गणपती बाप्पा मोरया ||

विषय: 
Groups audience: 
- Private group -
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जबरदस्त विषय आहे ! Happy

स्पर्धेचे नियम अटी टाकताना जरा गडबड झाली आहे.

आज बरोबर एक वर्ष झालं मी आयर्न मॅन स्पर्धा पुर्ण केली त्याला.

रिक्षा अलर्ट

अंधाराच्या जाळ्याकरता
भाग २ आणि भाग ३
https://www.maayboli.com/node/82540
https://www.maayboli.com/node/82546
तर
मोकळ्या आकाशाकरता भाग ४

https://www.maayboli.com/node/82551
वाचावा.

चांगला उपक्रम! मला लेख लिहीता येईल असे वाटत नाही पण गेल्या काही वर्षांत असा थोडा फार अंधाराचा काळ पाहीला. आता त्यातून बाहेर पडले आहे. बरंच काही शिकायला मिळालं. स्वतःची ओळख नव्याने पटली. जे कोणत्याही कठीण काळातून जात आहेत त्यांना दोन गोष्टी सांगेन
१. हे ही दिवस जातील. This too shall pass.
२. फार पुढचा किंवा मागचा विचार करू नका. आजचा दिवस माझा हा दृष्टिकोन ठेवून जगा! Take it one day at a time.

हो भूतकाळात आणि अलिकडच्या घटना आहेत. पण का कोण जाणे सार्वजनिक करणे जमेना. Sad

एक सांगावेसे वाटते, असा काळ आला कि अनेक गैस गळून पडतात. मुखवटे, उगीचच राखलेले इगोचे तण मुळापासून निघून जातात.
दाबलेल्या भावनांचे बांध बंधारे फुटून मोकळं होता येतं.... अशी वाट देण्यात पण सुख असतं भले मग रिझल्ट काही का असेना !

Raghu plus one