संयुक्त राष्ट्राकडून २०२३ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष’ (इंटरनॅशनल इअर ऑफ मिलेट्स) म्हणून जाहीर करण्यात आले आहे.
ऊर्जा व पोषण देणाऱ्या ‘मिलेट’ वा भरड धान्यांपासून मिळणारे आरोग्यसंबंधीचे फायदे खूप असल्याने त्याविषयी जनजागृती होणे आवश्यक आहे. भविष्यात धान्याचा तुटवडा पडू नये म्हणून जगभरातच भरड धान्यांचे उत्पादन वाढवण्याचे प्रयत्न आणि प्रक्रिया करण्यात येणार आहे.
त्यानिमित्ताने आम्ही घेऊन आलो आहोत ...
पाककृती स्पर्धा- Milets किंवा भरड धान्य वापरून पाककृती. (गहू, तांदूळ व्यतिरिक्त)
भरड धान्यापासून तयार केलेल्या विविध पाककृती स्पर्धेसाठी सादर करायच्या आहेत.
हि स्पर्धा आहे.
स्पर्धेचे नियम व अटी -
१. 'मायबोली गणेशोत्सव २०२३' या ग्रुपमध्ये नवीन पाककृती धागा काढून त्यात पाककृती लिहावी. 'मायबोली गणेशोत्सव २०२३' हा ग्रुप १९ सप्टेंबर २०२३ रोजी उघडेल.
२. धाग्याचे नाव पाककृती स्पर्धा-३ - Milets किंवा भरड धान्य वापरून पाककृती.- पदार्थाचे नाव- मायबोली आयडी किंवा खरे नाव (ऐच्छिक- जर प्रशस्तिपत्रकावर खरे नाव पाहिजे असेल तर ) अशा प्रकारे द्यावे.
३. पदार्थ बनवतानाचे दोन, यात साहित्याचा फोटोसुद्धा देऊ शकता आणि पदार्थ तयार झाल्यानंतरचा एक असे किमान तीन फोटो द्यायचे आहेत.
४. खाद्यपदार्थाचे नाव आधी द्यावे मग खाली साहित्य आणि पाककृती लिहावी.
५. खाद्यपदार्थ शाकाहारी असावा आणि तो बनवण्यासाठी लागणारे सगळे साहित्य स्पष्टपणे नमूद करावे.
६. कोणीही कितीही पाककृती देऊ शकतो.
७. प्रवेशिकेची अंतिम तारीख अमेरिकेतील पश्चिम किनाऱ्यावरील प्रमाणवेळेनुसार (पॅसिफिक टाइमझोन) २८ सप्टेंबर २०२३ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत (भारतीय वेळेनुसार २९ सप्टेंबर २०२३ दुपारी १२:३० वाजेपर्यंत )
पाककलापटू माबोकरांच्या चविष्ट प्रवेशिकांची प्रतीक्षा आहे.
|| गणपती बाप्पा मोरया ||.
छान आहे!
छान आहे!
छान.
छान.
गहू-तांदूळ अजिबात वापरायचे नाहीत की मुख्य घटक म्हणून वापरायचे नाहीत?
मुख्य घटक म्हणून वापरायचे
मुख्य घटक म्हणून वापरायचे नाहीत. थोडी सवलत चालेल
>>पदार्थ बनवतानाचे आणि पदार्थ
>>पदार्थ बनवतानाचे आणि पदार्थ पूर्ण झाल्यानंतरचे असे एकूण तीन फोटो किमान आवश्यक आहेत.
दोन होतील ना ते?
एक साहित्याचा अपेक्षित आहे का?
वरी भरड धान्यात येत का
वरी भरड धान्यात येत का
नवीन Submitted by स्वरुप on
नवीन Submitted by स्वरुप on 23 September, 2023 - 12:49 >> पदार्थ बनवतानाचे दोन यात साहित्याचा फोटोसुद्धा देऊ शकता आणि पदार्थ झाल्यावरच एक असे तीन फोटो द्यायचे आहेत. धागा अपडेट केला आहे.
नवीन Submitted by मनीमोहोर on 23 September, 2023 - 13:२४ >> वरई भरड धान्यात येते. तुम्ही वापरू शकता.