लोकहो, झाडांचे जंगल कमी होत होत आता काँक्रीटचे जंगल वाढायला लागले आहे. वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा होणार नाश आणि त्यामुळे वातावरणावर होणारे परिणाम आपण अनुभवतो आहोत. अनियमित पाऊस, वाढलेले उष्णतेचे प्रमाण, प्रदूषित हवेमुळे आपल्या आरोग्यावर होणारा परिणाम या सर्वांना आपण सामोरे जात आहोत. या सर्वांवर वृक्षसंवर्धन हा एक उत्तम उपाय आहे. वृक्षसंवर्धनाचे महत्व लहान मुलांना समजावे म्हणून संयोजक टीम मायबोलीकरांच्या छोट्यांसाठी यावेळी वृक्षारोपण व संवर्धन हा चित्रकलेचा आणखी एक उपक्रम घेऊन आली आहे. यात बाळगोपाळांना वृक्षारोपण व संवर्धन याचे महत्व सांगणारे चित्र काढून रंगवायचे आहे.
तर चालू करा बालगोपाळांनो, या विषयावर चित्र काढा आणि पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी एक पाऊल पुढे टाका.
हा उपक्रम आहे स्पर्धा नाही.
उपक्रमाचे नियम व अटी -
१. 'मायबोली गणेशोत्सव २०२३' या ग्रुपमध्ये नवीन धागा काढून त्यात लेखन करावे. 'मायबोली गणेशोत्सव २०२३' हा ग्रुप १९ सप्टेंबर २०२३ रोजी उघडेल.
२. धाग्याचे नाव चित्रकला उपक्रम-२ - छोटा गट - वृक्षारोपण व संवर्धन - मायबोली आयडी - बाळगोपाळांचे नाव.
३. हा उपक्रम फक्त मायबोलीकरांच्या मुलामुलींकरता आहे.
४. वयोगट - 15 वर्षे पर्यंत.
५. कोणीही कितीही प्रवेशिका देऊ शकतो.
४ . प्रवेशिकेची अंतिम तारीख अमेरिकेतील पश्चिम किनाऱ्यावरील प्रमाणवेळेनुसार (पॅसिफिक टाइमझोन) २८ सप्टेंबर २०२३ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत (भारतीय वेळेनुसार २९ सप्टेंबर २०२३ दुपारी १२:३० वाजेपर्यंत )
|| गणपती बाप्पा मोरया ||
मस्त!!
मस्त!!