मायबोलीकरांनो, शाळेत असताना असे चित्र आपण नक्कीच काढले असेल ज्यात शिक्षक टेबलवर काही वस्तूंची मांडणी करायचे आणि आपल्याला ते बघून त्याचे चित्र काढायला सांगायचे. या स्पर्धेचा हाच विषय आहे यात तुम्ही तुमच्या पुढे टेबलवर काही वसूंची मांडणी करायची आहे. उदा. फुलदाणी, थाळी, बाटली, छोटे मडके, फळे असे काहीही. ते बघून त्याचे चित्र तुम्ही काढायचे आहे आणि धागा काढून त्यात पोस्ट करायचे आहे.
चला तर मग, शाळेतील ते बालपण आपण परत जगूया.
हि मोठ्यांसाठी स्पर्धा आहे.
स्पर्धेचे नियम व अटी -
१. 'मायबोली गणेशोत्सव २०२३' या ग्रुपमध्ये नवीन धागा काढून त्यात फोटो द्यावे. 'मायबोली गणेशोत्सव २०२३' हा ग्रुप १९ सप्टेंबर २०२३ रोजी उघडेल.
२. धाग्याचे नाव चित्रकला स्पर्धा-२ - मोठा गट - वस्तुचित्र - मायबोली आयडी किंवा खरे नाव (ऐच्छिक- जर प्रशस्तिपत्रकावर खरे नाव पाहिजे असेल तर ) अशा प्रकारे द्यावे.
३.समोर मांडलेल्या वस्तूंचा एक फोटो, चित्र तयार होत असतानाच एक आणि चित्र पूर्ण झाल्यावर त्याचा एक असे किमान तीन फोटो द्यायचे आहेत.
४. शेडींग आणि सावली दाखवण्यासाठी फक्त पेन्सिलचासुद्धा तुम्ही वापर करू शकता किंवा रंग वापरूनसुद्धा तुम्ही हे इफेक्ट दाखवू शकता. दोन्ही पर्याय चालतील.
५. कोणीही कितीही प्रवेशिका देऊ शकतो.
६. प्रवेशिकेची अंतिम तारीख अमेरिकेतील पश्चिम किनाऱ्यावरील प्रमाणवेळेनुसार (पॅसिफिक टाइमझोन) २८ सप्टेंबर २०२३ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत (भारतीय वेळेनुसार २९ सप्टेंबर २०२३ दुपारी १२:३० वाजेपर्यंत )
|| गणपती बाप्पा मोरया ||