अक्षय समेळ

इतकीच खंत - भाग १

Submitted by अक्षय समेळ on 13 October, 2021 - 01:02

"माणगाव आलंय, ज्यांना उतरायचं आहे त्यानी पटकन उतरा. गाडी जास्त वेळ स्टॉपवर थांबणार नाही." कंडक्टर नेहमीच्या सवयीने ओरडला.

त्या आवाजामुळे अजिंक्य खडबडून जागा झाला आणि घाई घाईने आपले सामान उतरवू लागला.

"तुम्हाला इथे उतरायचे आहे का?" अजिंक्यच्या शेजारील प्रवाशी उठून बाजूला होत विचारू लागला.

"हो." अजिंक्यने स्मितहास्य करत उत्तर दिले आणि उतरण्यासाठी दरवाजा जवळ जाऊ लागला.

"अहो! लवकर उतरा चला, गाडीला जास्त वेळ थांबता येणार नाही" कंडक्टर थोडा नाराजीच्या सुरात म्हणाला.

अजिंक्य उत्तर न देताच खाली उतरला आणि सवयीप्रमाणे स्टॉपवर असलेल्या नवनाथ रसवंती गृहात शिरला.

प्रेमाचा जुगार

Submitted by अक्षय समेळ on 7 October, 2021 - 01:06

भिडताच नजरेला नजर आपली
प्रेमाचा सजला जुगार पटलावरी
फेकले फासे, पहिले दान पडले
पहिल्याच पणाला हृदय अर्पिले

हळूहळू स्वतःचा विसर पडला
जसा खेळ चांगलाच रंगात आला
हारता हारता कळलेच न मजला
प्राण माझा कधी पणाला लागला

उरले नव्हते आता मज जवळ काही
जिंकली होती ती शेवटचे दान ही
संपला होता प्रेमाचा जुगार पटलावरी
हाती माझ्या मात्र काहीच लागले नाही

- अक्षय समेळ.

एक महाकवी असा ही होऊन गेला...

Submitted by अक्षय समेळ on 6 October, 2021 - 00:11

माझे प्रेरणा स्त्रोत असलेले महाकवी ग्रेसना ही कविता समर्पित.

अथांग साहित्याच्या सागरात
एक माणिक खास चमकून गेला
आपल्या शैलीशी तडजोड न करणारा
एक महाकवी असाही होऊन गेला

अर्थाचे जाळे त्याला शब्दांची किनार
त्याचे काव्य जणू विश्वाचा आकार
गहन अन् गंभीर विषयाला गुढतेचे वलय
कवी ग्रेस म्हणजे कोणी साधा कवी नव्हे

एक एक शब्द जणू परका वाटावा
अगदी विद्वाना देखील अर्थ न लागावा
असेच आहे काहीसे ग्रेस चे साहित्य
वाचकांना मंत्रमुग्ध करणारी भाषेची किमया

- अक्षय समेळ.

आशा

Submitted by अक्षय समेळ on 6 September, 2021 - 10:00

मंदावले चांदणे, अंधुकल्या वाटा
दिशा शोधण्यास प्रकाश काजवांचा
सुख निजले होते विवांचनेच्या कुशीत
जागताच आज पापण्या पाणावल्या

उदासीन मनाचा आज बांध फुटला
फेर धरून चौफेर मनसोक्त नाचला
लांघून साऱ्या सीमा मायावी जगाच्या
तो बेधुंद अवकाश गमन करून परतला

- अक्षय समेळ.

Pages

Subscribe to RSS - अक्षय समेळ