प्रिया

देव भेटलेला माणुस!

Submitted by रीया on 16 May, 2012 - 03:17

देव भेटलेला माणुस!

रविवारचा दिवस, हातात मस्त कॉफी..आणि सोबतीला वर्तमानपत्र....!
तस हे वर्णन आमच्या घरातल्या कुठल्याही सकाळसाठी फिट बसेल कारण पेपर वाचल्या शिवाय माझा दिवस पुढे सरकतच नाही. लहानपणी अनेकदा त्यावरुन आईचा मारही खाल्लायं. "सकाळी सकाळी कामधाम सोडुन पुरुषासारखा पेपर काय वाचत बसलियेस कार्टे?" हा आजीचा प्रश्न इतक्या वर्षात काहीच बदल न झाल्याने "पारच वाया गेलीये ही मुलगी!" हा भाव असलेल्या सुस्कार्‍यांमध्ये बदललाय इतकाच काय तो इतक्या वर्षाच्या सकाळमध्ये झालेला बदल.

गुलमोहर: 

एक सर इवलीशी

Submitted by रीया on 25 April, 2012 - 01:33

एक सर इवलीशी

एक सर इवलीशी
दावी रुपे किती किती
धागा गुंफते मनाचा
त्यात आठवांचे मोती

एक सर इवलीशी
गूज आईचे सांगते
मातीतच मिसळते
गंध मातीलाच देते

एक सर इवलीशी
रूप "बा"चे ती दावते
प्रेम बरसवे सारे
स्वत: होऊनिया रिते

एक सर इवलीशी
अशी मला बिलगते
जशी खट्याळ बहीण
माझ्या पदरी लपते

एक सर इवलीशी
सखीपरीस भासते
स्पर्शानेच शब्दाविन
सांगी अनेक गुपिते

एक सर इवलीशी
"त्या"च्या सारखी लबाड
येता आनंद पाझरे
जाता अश्रुंचे घबाड

गुलमोहर: 

सृष्टी (महिला दिनानिमित्त)

Submitted by रीया on 8 March, 2012 - 01:35

"सृष्टी "

एक कथा ही गमतीची
पृथ्वीच्या निर्मितीची
विधात्याची सुंदर कृती
नाव होते तिचे सृष्टी

घेऊन गेला ग्रहांकडे तिज
कोण असावा योग्य आधार?
प्रश्न पडला त्या कर्त्याला
जो तो म्हणे मीच थोर

ग्रह पहिला बुध बोले,
"नाते जवळचे भास्काराशी
प्रकाशमान ती राहील नेहमी
ठेऊन द्यावी माझ्यापाशी".

ग्रह दुसरा गुरु बोले,
"सगळ्या ग्रहात मीच मोठा
सृष्टी द्यावी माझ्यापाशी
कधी न तिजला कुठला तोटा".

ग्रह तिसरा बोले शन,,
"माझ्या भोवती आहे कडे
संरक्षणाची नसेल चिंता
सृष्टी द्यावी माझ्याकडे".

ग्रह चौथा बोले मंगळ,
"लाल लाल मी आहे सुंदर
माझ्यापाशी ठेऊन द्यावे

गुलमोहर: 

ओळखीचा पाऊस

Submitted by रीया on 2 March, 2012 - 05:32

"ओळखीचा पाऊस"

अशाच एका संध्याकाळी
पाऊस होता मुसळधार
अनोळखी ही नजर माझी
शोधत होती एक आधार

तोच म्हणे पाऊस अचानक
अनोळखी मज म्हणशी का गं
माझीच सखे अनेक रूपे
तुझाच जणू अविभाज्य भाग

मी ही राणी पोटामध्ये
लखलखणारी वीज ठेवतो
तरीही खोट्या आनंदाने
ढगामधुनी गडगडतो

तू ही अशीच ठेवतेस ना ग
हृदयामध्ये दाबून कळ
हास्य घेउनी ओठांवरती
मनामधले झाकतेस वळ

मीही बघ न जमिनीला
भेटायाला वरून येतो
जाताना मी होऊन रिता
तिला प्रफुल्लीत करून जातो

तुझीही ओंजळ संपून जाते
तुझ्याच सार्‍या लोकांसाठी
तुझी स्वप्ने तुझ्या अपेक्षा
तुझ्या मनाची होते माती

वेदनेचे रूप माझे

गुलमोहर: 

संध्याकाळ

Submitted by रीया on 23 February, 2012 - 21:30

संध्याकाळ

अशाच एका संध्याकाळी तुझी आठवण दाटून आली
डोळ्यामध्ये साठवलेले अश्रू सहज सांडून गेली

एकेक दिवस एकेक क्षण तुझ्या माझ्या भेटी मधले
एकेक भाव एकेक स्पर्श तुझ्या निश्चयी मिठी मधले

तोच चंद्र तीच रात तीच झुळूक वार्‍याची
आजही वेडी प्रीत माझी वाट पाहते या सार्‍याची

बकुळीची फुले पाहता तुझा स्पर्श आठवतो
त्या माळेचा सुगंध सजणा आजही मन भरून वाहतो

आज ही कंठ दाटून येतो होतो आठवांचा पसारा
आज ही तुझाच भास होतो झेलून घेता पाऊसधारा

सारे काही तसेच आहे पाऊस, वारा, बकूळमाळ
आता फ़क़्त परकी झाली तुझ्याविना ही संध्याकाळ.....

गुलमोहर: 

कलियुग

Submitted by रीया on 22 February, 2012 - 10:54

कलियुग

एकदा मला भेटला देव
दिसायला वेगळा,वागायला वेगळा
अपेक्षेपेक्षा फारच आगळा
चक्क होता पँट शर्ट मध्ये
एक ऐटदार गॉगल डोळ्याला
मला 'Excuse me' म्हणाला
च्यायला हा तर इंग्लिश बोलतोय Uhoh
विचारलं "कोण हवाय आपल्याला?"
माझ्याकडे बघून हसायला लागला
"अगं देव देव म्हणतात तो मीच"
मी किंचाळले "हलकट,नालायक,पाजी,नीच"
तो म्हणाला "कलियुग! घोर कलियुग आलाय"
म्हणलं "चल फुट इथून टिव्हीवर श्री गणेश लागलाय "
तो : "मी आहे ना इथे? मग बघ कि मला"
मी : म्हणाले "तू आणि देव?? काय वेड बिड लागलाय का तुला?"
तो : "अगं खरचं ! don’t you recognize me"

गुलमोहर: 

पाऊस

Submitted by रीया on 20 February, 2012 - 00:52

पाऊस

'पाऊस' त्याच्यासाठी कोसळतो,
तिच्यासाठी बागडतो
त्या दोघांच्याही विश्वात
तो वेगवेगळा बरसतो

'पाऊस' म्हणलं की तिला आठवतात
त्यांच्या चोरून झालेल्या गाठीभेटी
त्याच्या प्रत्येक अबोल प्रश्नांची
असलेली उत्तरं तिच्या ओठी

त्याला मात्र आठवतात
रंगलेल्या फूटबॉल matches
अन् भज्यांसोबत जीरवलेले
बंक केलेले college classes

तिला आठवतं याच पावसात
त्यांनी पहिल्यांदा propose केलेलं
त्याला आठवत याच पावसामुळे
तिन उत्तरं देण टाळलेलं

तिला आठवतो तो गारवा
पहिल्या भेटीत जाणवलेला
त्याला आठवत त्याच्याच नंतर
तिच्या अंगी ताप भरलेला

तिला आठवते bike drive
याच पावसात केलेली

गुलमोहर: 

माझी प्रिया

Submitted by भाऊ नमसकर on 21 September, 2010 - 09:57

फाड फाड ती बोलतच होती
फाडूनच मला टाकत होती
धबधब्याखाली त्या गारठून जणू
नि:शब्द, नि:श्चल खडकासारखा मी
पण... आतून मात्र ओलाचिंब
अन दाण दाण आपटत पाय
सूंसाट वार्‍यासारखी
लेखत मला कस्पटासमान
निघाली पण ती
पटकन मग करून मी टाकला
करावा लागणारच होता तो फोन
अन आलीच ती वळून माघारी
रेंगाळल्या लेकराला
फरफटत न्यायला येणार्‍या मायेसारखी
अगदी तशीच खेंकसत
" अरे, घसा आला सुकत माझा
तर दटावून एकदा तरी सांगायचं,
बसतेस का चूप आता"
म्हटलं तिला, श्वास घ्यायला थांबशील
तेव्हा करणारच होतो ना फोन
आत्ताचंच करायला रीझर्वेशन
समुद्रकांठच्या तुझ्या आवडीच्या
खिडकीनजीकच्या त्या टेबलाचं

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - प्रिया