गजानन
१९९८/९९ साली अचानक गणपतीची अनेक रेखाचित्रे मी मनाने केली होती. त्यातलेच हे एक. चित्र संकल्पना आणि चित्रशैली पूर्ण माझी आहे. मात्र तेव्हा दाभोळकर यांच्या गणपती चित्रांचा माझ्यावर फार प्रभाव होता.
||गणपती बाप्पा मोरया| मंगलमूर्ती मोरया|| _/\_
गजानना तव रूप मनोहर _/\_
१.
२.
३.
४.
५.
६.
७.
वाचतो गजानन l पाहतो गजानन l
ऐकतो गजानन l कौतुकाने ll १ll
भेटतो गजानन l सांगतो गजानन l
समजावे गजानन l अध्यात्म मज ll २ ll
संत गजानन l योगी गजानन l
प्रभू गजानन l स्वामी माझा ll ३ll
परी तो गजानन l जाणून मन l
देईल आलिंगन l का मज प्रेमे ll ४ll
काही न मागण l तया प्रेमाविण l
भक्तीचे स्फुरण l फक्त हवे ll ५ll
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/