वाचतो गजानन l पाहतो गजानन l

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 3 February, 2013 - 09:09

वाचतो गजानन l पाहतो गजानन l
ऐकतो गजानन l कौतुकाने ll १ll
भेटतो गजानन l सांगतो गजानन l
समजावे गजानन l अध्यात्म मज ll २ ll
संत गजानन l योगी गजानन l
प्रभू गजानन l स्वामी माझा ll ३ll
परी तो गजानन l जाणून मन l
देईल आलिंगन l का मज प्रेमे ll ४ll
काही न मागण l तया प्रेमाविण l
भक्तीचे स्फुरण l फक्त हवे ll ५ll

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users