किलबिल : गणपती बाप्पा - ईशा
नाव : ईशा दामले
वय : ७ वर्ष
चित्राचे माध्यम : पेन्सिल, कलर पेन्सिल, क्रेयॉन्स
आमची मदत : चित्र शोधायला मदत करणे आणि इतर पालकांप्रमाणेच सतत भुणभुण
नाव : ईशा दामले
वय : ७ वर्ष
चित्राचे माध्यम : पेन्सिल, कलर पेन्सिल, क्रेयॉन्स
आमची मदत : चित्र शोधायला मदत करणे आणि इतर पालकांप्रमाणेच सतत भुणभुण
मुलाचे नाव - ऋषी वैद्य
वय - ७ वर्षे
माध्यम - क्रेयॉन्स
शाळेत "ग्रीन गणेशा" नावाच्या संकल्पनेवर आधारीत कार्यक्रमासाठी हे चित्र काढले होते. पानांचे आकार मी काढून दिले आहेत, त्याने चित्र रंगवून खाली सही केली आहे.
नाव : मिहिका
वय : ६ वर्षे
'किलबिल' ची घोषणा झाल्यापासूनच मिहिका चित्र काढून पाठवणार हे नक्की होते. त्यासाठी काही चित्रंही आम्ही सिलेक्ट केली होती. पण शाळेची परीक्षा सुरु झाल्याने जरा हा विषय बाजूला पडला. आता परीक्षा संपल्यावर शेवटी आज मुहुर्त लागला.
आमची मदत : तिला काढायला सोप्पी पडतील अशी चित्रं निवडणे.
मायबोली आयडी : पौर्णिमा
नांव : नचिकेत छत्रे
वय : ७ वर्षे
वापरलेले साहित्य : नारळाच्या शेंड्या, झाडाची वाळलेली पानं, वाळलेलं गवत, कापूस, एक पेपर प्लेट (नारळाची करवंटीही वापरू शकतो), चिमणीचं चित्र, काडेपेटीची एक काडी, फेव्हिकॉल.
माझी मदत- साहित्य गोळा करून देणे, थोड्या कल्पना देणे..
शाळेमध्ये 'पक्ष्याचे घरटे' असं प्रोजेक्ट होतं.. त्यासाठी वापरलेले सर्व मुख्य साहित्य हे टाकाऊ आहे.
:
मुलीचे नांव - प्रांजल
वय - ३.५ वर्षे
चित्राचे माध्यम - पेन्सिल
मदत - प्रथम मी तिला गणपतीचे चित्र काढून दाखवले. नंतर तिच्या हाताला धरून चित्र काढायला शिकवले.मग तिला स्वतः चित्र काढायला लावले. एक ,दोन प्रयत्नानंतर तिने हे चित्र काढले. गणपतीबाप्पाला तोंड कुठंय????
म्हणून सोंडेवरती तिने तोंडही काढले.
!!!! गणपतीबाप्पा मोSSSलया !!!!
लेगो गणेश
नाव : हर्ष
वय : साडेनऊ वर्षे
माध्यम : लेगो ब्लॉक्स
मदत : मॉडेल म्हणून गणपतीचा फोटो शोधून देणे.
आज सकाळी मायबोली गणेशोत्सवाबद्दल घरी सांगत होते तेव्हा त्याला एकदम मागच्या वर्षीच्या गणेशोत्सवात दिलेल्या चित्राची आठवण झाली. ह्या वर्षी चित्राऐवजी दुसरं काहीतरी म्हणून मग लेगोचा गणपती करायचा ठरवला. आणि अवघ्या १/२ तासात हा बाप्पा तयार झाला
बाल गणेश
सानिका, वय साडेपाच.
माध्यमः पेन्सिल, क्रेयॉन्स, रंगीत मार्कर्स
माझी मदत : रेफरन्स म्हणून अनेक चित्रे नेटवरून शोधून तिला दाखवणे,
(बाकी प्रयत्न बराच केला, अगं हात पाय असे का, ते तसे कर, हातात चेंडू नाहिये काही तो, मोदक असा असतो वगैरे पण तिने जाम ऐकले नाही, शेवटी म्हणाली "व्हाय डोन्ट यु ड्रॉ युअर ओन गणेशा?" )