किलबिल - लेगो गणेश

Submitted by पन्ना on 11 September, 2010 - 16:30

लेगो गणेश

नाव : हर्ष
वय : साडेनऊ वर्षे
माध्यम : लेगो ब्लॉक्स
मदत : मॉडेल म्हणून गणपतीचा फोटो शोधून देणे.

आज सकाळी मायबोली गणेशोत्सवाबद्दल घरी सांगत होते तेव्हा त्याला एकदम मागच्या वर्षीच्या गणेशोत्सवात दिलेल्या चित्राची आठवण झाली. ह्या वर्षी चित्राऐवजी दुसरं काहीतरी म्हणून मग लेगोचा गणपती करायचा ठरवला. आणि अवघ्या १/२ तासात हा बाप्पा तयार झाला Happy

IMG_2838_0.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लालू, हो. उजव्या सोंडेचा झालाय. नेमका मॉडेल गणपती म्हणून जो फोटो दिला (आरत्यांच्या पुस्तकावरचा गणपती) त्यात जसा होता तसा केला. मी सांगत होते डावीकडे सोंड कर म्हणून तर शांतपणे पुस्तकाकडे बोट दाखवलं, वर "तिकडे चालतो तर इकडे पण चालेल" असलं तत्त्वझान ऐकवलं Happy

मृ, अगं त्याच्याकडे ७-८ प्रकारचे लेगो आहेत, त्यातला एक अ‍ॅक्वामरीन आहे. त्यातल्या शार्कचे दात आहेत ते Proud

मै Lol

फारच सर्जनशील आहे हर्ष. त्याची आई-वडीलांनी ही सर्जनशीलता जपायला हवी. प्रोत्साहन देऊन फुलवायला हवी आहे. खासकरुन जर हर्ष भारतात रहात असेल तर शाळा, अभ्यास आणि परिक्षा यातुन सर्जशीलता जपायला ना शाळांना औत्सुक्य रहाते न पालकांना ( हे वाक्य सर्वसाधारण शाळा व पालक यांच्याबद्दल आहे. ) जो तो परिक्षेत अधिक गुण मिळवण्याच्या स्पर्धेत मग्न असतो.

Pages