किलबिल - लेगो गणेश

Submitted by पन्ना on 11 September, 2010 - 16:30

लेगो गणेश

नाव : हर्ष
वय : साडेनऊ वर्षे
माध्यम : लेगो ब्लॉक्स
मदत : मॉडेल म्हणून गणपतीचा फोटो शोधून देणे.

आज सकाळी मायबोली गणेशोत्सवाबद्दल घरी सांगत होते तेव्हा त्याला एकदम मागच्या वर्षीच्या गणेशोत्सवात दिलेल्या चित्राची आठवण झाली. ह्या वर्षी चित्राऐवजी दुसरं काहीतरी म्हणून मग लेगोचा गणपती करायचा ठरवला. आणि अवघ्या १/२ तासात हा बाप्पा तयार झाला Happy

IMG_2838_0.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्लासच. मस्त झालाय म्हणुन हर्षला सांग. आयडिया भारी आहे.
मला तो तु.क. कधीकधी २० दा पण मिळतो दिवसभरातुन. मग मी घरातल्या ३ र्‍या माणसावर तु.क. टाकून मनाच समाधान करुन घेते झाल. Proud

मस्त .तु.कं. नाही काही .''गणपतीबाप्पाने सोंड कुठल्या बाजुला वळवावी हे आपण कोण सांगणारे''अस
त्याला म्हणायच असेल.जसा आहे तसा बनवण योग्य,व आपल्या विचारावर ठाम रहाण त्याहून छान .
आवडला बाप्पा .

मस्त Happy

किती छान केला आहे. केवळ एका चित्रावरून इतका सुंदर गणपती करणे खरचं कौशल्याचे काम.

बाकी तुझ्या मुलाचं बरोबर आहे. ज्यांना डाव्या सोंडेचा गणपती हवा असेल त्यांनी हा गणपती आरशात पहावा. Happy

सगळ्यांना हर्षकडून "धन्यवाद" Happy

तो खरचं थँक यू च्या ऐवजी धन्यवाद म्हणतो. (आणि कधीकधी समोरच्यालाही म्हणायला लावतो Wink )

हर्ष, एकदम मस्त आहे लेगो गणेश. शार्कचे दात अगदी फिट्ट बसलेत. आणि ते जास्वंद आहे का हातात?

सहीच Happy

Pages