.

.
नेहमीच्या सवयीप्रमाणे संध्याकाळी मी माझ्या आवडत्या ठिकाणी बसलो होतो. दूर दूर पसरलेली अस्फुट अनाकलनीय ती क्षितिज रेषा , जेथुन माझी देवयानी अलगद अवतरते अन् अल्लड प्रियतमेगत अनिवार ओढिने हळू हळू माझ्याच दिशेने येत ह्या उधाळणाऱ्या प्रेम सागराच्या लाटेवर स्वार होत हृदयाच्या किनाऱ्यावर दिमाखात विसावते ; तेच हे माझे आवडते स्थान.... रुपेरी पुळणीवर पसरलेले मीऱ्या बंदर. तुझी आतुरतेने वाट पहात बसण्याचे आणि अर्थातच तुझे हसतमुखानी स्वागत करण्याचे एकमेव ठिकाण !
रडणं.. जन्मताच सगळ्यात पहिली जमणारी गोष्ट.. जेव्हा आपण रडतो अन आई हसते असं आपलं एकमेव रडणं.. हळू हळू जरा काही नाही मिळालं कि भोकाड पसरून दंगा करायचा म्हणजे आईची माघार असं समीकरणच बनत.. कितीदा रडतो लहानपणी, गणित नाही.. अन रडून पुन्हा लगेच विसरून जणू काही झालाच नाही असं समजून हसणं बाघडण सुरु.. अल्लड वय ते.. ते रडणं पण डोळे स्वच्छ करण्यापुरतंच.. कधी कधी पडताना लागलंच, तरच मनापासून कळवळून रडणं येत असेल.. पण ते हि क्षणिक.. रडण्याचे सुखाचे दिवस म्हणजे आपलं बालपण..
.

.
मी चिवडा केला नाही,
मी चकली केली नाही.
मी लाडूसुद्धा वळला नाही.
कशाला उगीच वजन वाढवणे
या आमच्याकड़े दिवाळीला
चॉकलेट कैडबरीच्या फराळाला
नको तेलाचेे तळणे
अनारसे आणि बोरे
नको ते लाटणे
शंकरपाळी आणि करंजे
या आमच्याकड़े दिवाळीला
चॉकलेट कैडबरीच्या फराळाला
हळूच सोडतोस केस..माळतोस चांदणे...
सख्या,कसे? कुठून रोज,आणतोस चांदणे?
अधीर ओठ साधतात मौनही कसे तुझे?
किती अरे,उरात खोल पेरतोस चांदणे!
बनून स्वप्न चोरतोस झोप रोजचीच तू...
विचारताच,चोर कोण?सांगतोस..चांदणे!
उनाड चंद्रमा बनून हिंडतोस रात्रभर
पहाट-वेळचे..टिपूर मागतोस चांदणे!
नभात लक्ष तारका उधाणतात कैकदा
मिठीत केवढे कसून घुसळतोस चांदणे!
रसाळ चांद,वितळतो..मधाळ रात वाहते...
असे कुण्या सुरांत रे! पुकारतोस चांदणे!
—सत्यजित
तर हा काळ आहे साधारण २००५ मधील, जेव्हा अस्मादिक आयआयटी खरगपूरमध्ये उच्चशिक्षणासाठी दाखल झाले होते. मार्च महिन्यातला पहिला/दुसरा मंगळवार होता. होमसिकनेसमुळे घरापासून लांब रहाण्याचा एक दिवस संपला, याचा आनंद मी दर दुपारी जेवण करून वसतीगृहाच्या खोलीत टांगलेल्या कालनिर्णयच्या त्या दिवसाच्या चौकोनावर लाल फुली मारून साजरा करायचो. याबद्दल माझा रूममेट मला “रेड क्रॉस XXX” या नावाने चिडवायचा देखील. सावरकर अंदमानात असताना भिंतीवर रेघा मारून दिवसाची सुरूवात करत असे कुठेतरी वाचले होते. मी फक्त फुल्या मारून दिवस संपवायचो. तशीच फुली मारताना लक्षात आले अरे आजतर "महाशिवरात्री".
पहाटेची वेळ होती, दाल सरोवरात वेगवेगळ्या रंगांची मनमोहक कमलदले फुलली होती. त्यांचा मादक गंध आसमंतात दरवळत होता. त्या सुगंधाला भुलून एक भुंग्यांची टोळी बेधुंद होऊन रसपान करू लागली. भृंगूला कळेच ना की ह्या कमळावर बसू की त्या? अखेर त्यानी एकाची निवड केलीच. कोवळ्या पांढऱ्या स्वच्छ पाकळयांवर विराजमान होऊन भृंगराज स्वतःशी गुणगुणू लागले. सूर्याची कोवळी किरणे जाऊन आता जरा ऊन बोचू लागलं होतं. म्हणून मग जरा जंगलात फेरफटका मारायचा बेत ठरला. सगळी भुंग्यांची टोळी सुरूबनात गारव्याच्या शोधात गेली. आपले भृंगराजही मित्रांबरोबर पकडापकडी खेळण्यात दंग झाले.
दुःखद घटना व त्यावर चर्चेसाठी हा नविन धागा.जुन्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद कधीच पार केले पण कुणी नवीन धागा काढत नव्हते.नवीन प्रतिसाद इथे लिहा.
जुना धागा https://www.maayboli.com/node/44524
चाललो शहराकडे मी..गाव सांभाळून घे
मांडतो आहे नव्याने..डाव सांभाळून घे!
सवय झाली एकदा की क्षीण होते वेदना
लागतो जो जो जिव्हारी..घाव सांभाळून घे!
जीव तुटतो त्या क्षणीही याद मी येईल पण
तू उखाणे घेत असता,नाव सांभाळून घे!
वेगळ्या वाटा तुझ्या अन् वेगळ्या माझ्या सही
टाळ तू प्रत्येक काटा..धाव सांभाळून घे!
काजळाची रेघसुद्धा वाटते आहे गझल
तू तुझ्या नजरेत माझे भाव सांभाळून घे!
—सत्यजित