.

.
आज जास्तच गर्दी होती तिकडे , कामाच्या ताणामुळे 3-४ दिवस नीट झोप सुद्धा झाली नव्हती हे त्याच्या डोळ्याखालची वर्तुळे स्पष्ट सांगत होती.
सर्वांकडे जातीने लक्ष देताना त्याची पुरती दमछाक होत होती. मी मात्र आजुबाजूच्या लोकांच्या नकळत फक्त त्यालाच बघत होतो. निराकार अस्तित्व माझं कुणाला जाणवत नाही पण सगुण परिणामाने सर्वजण हमखास बिथरुन जातात.
.

.
शब्द
~~~~
.
शब्द उमटला
अर्थ मिळवला
शब्द वाढला
कलह आरंभला
शब्द झिरपला
सांत्वन जाहला
शब्द गोंजारला
मद उफाळला
शब्द झेलला
आज्ञा लाधला
शब्द पडला
आब ओशाळला
शब्द अक्षय्य ठेवला
शब्द निश्चय मांडला
शब्द उलगड़ता मनाला
पुनश्च निःशब्द मात्र झाला ....!
― अंबज्ञ
1
- ऑर्केस्ट्रा ला जायला उशीर झाला.
आमच्या कडे टीव्ही नाही- म्हणजे..ठरवून घेतला नाही.. सुरुवातीला हा निर्णय किंवा विचार जयच्या गळी उतरवायला वेळ लागला... टीव्ही नाही म्हणजे आपल्या जगण्यातला एक महत्वाचा हिस्सा नाही, आपण इतरांपेक्षा मागे राहू, आसपासच्या जगामध्ये, आपण जिथे काम करतो त्या इंडस्ट्री मध्ये काय चाललंय आपल्याला कळणार नाही, अशी काहीतरी भावना त्याच्या मनात असावी... त्याला मी समजावलं, ट्रायल बेस वर हे करून बघूया, काही अडलं तर घेऊ की टीव्ही.. असं म्हंटल्यावर तो तयार झाला...
आम्ही दिवे विझवत नाही !!
मी कोणाला हिणवत नाही
आम्ही दिवे विझवत नाही.
**
करा वाढदिवस साजरे
औक्षणाला विसरत नाही
**
किती पिशील तू नशेला
ढोसण्या ते सरबत नाही
**
गेला सोडून जरी मला रे
तुझ्याविना मज करमत नाही
**
ज्योतीने आम्ही प्रेम वाटतो
अंधाराला कोणी जमवत नाही
**
नका म्हणू हो कवी आम्हाला
कवने दुसऱ्याची पळवत नाही
**
कधी ना चिंतितो अहित दुसऱ्याचे
भले कराया आम्ही शरमत नाही
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
०२-०४-२०१८
2016 साली या दिवसात आमची दहावीची परीक्षा सुरू होती. आयसीटीचा पेपर संपला होता. शेवटचा फक्त एकच पेपर राहीला होता. आणि मग परीक्षा संपून आम्ही उनाडक्या करायला मोकळे होणार होतो. पण सगळच आपल्या मनासारख होईल तर नशीब हा फॅक्टर आपल्या आयुष्यात नसला असता. त्या दिवशीही आम्ही पेपर सुटल्यावर चर्चा करत शाळेबाहेर पडलो. माझ्या बेस्ट फ्रेंड आदित्यचा मित्र माझ्याच शाळेत होता.तो इंग्लिश मिडीयमला होता आणि मी सेमी इंग्लीशला. त्यामुळे सहसा आमची भेट होत नसे. पण आता परीक्षा सुरू असल्यामुळे झालेल्या पेपरवर चर्चा करत बर्याचदा आम्ही भेटत होतो.त्या दिवशीही असेच पंधरा वीस मिनीटं गप्पा मारत उभे होतो.
मार्च महिन्यातली दुपार. आदित्य पुस्तक वाचत सोफ्यावर आरामात लोळत पडला होता. पुस्तक हा आदित्यचा वीक पाॅईंट. जेव्हा तो वाचायला शिकला तेव्हापासून पुस्तकांवर त्याच प्रेम जडलं. वाचताना तो फक्त पुस्तकाचा असायचा. आजूबाजूच्या जगाच त्याला भानच रहात नसे. आता तर काय त्याची बारावीची परीक्षाही संपली होती . त्यामुळे पुढचे तीन महिने पुस्तकंच त्याची दुनिया होती. आताही तो त्याच विश्वात मशगूल होता. घरात एकीकडे आई जेवण बनवत होती. सुट्टीमुळे सगळंच निवांत सुरू होतं.
परवाच घटना घडली. मागचे बरेच महिने त्या दोघांना ऑफिसच्या आसपास एकत्र पाहत होतो. लंच अवर मध्ये किंवा ऑफिस सुटायच्या नंतर हा कुठूनसा यायचा तिथे तिला घ्यायला. आणि जायचे दोघे कुठेतरी. शंका पण अनेकदा आली होती कि इतका फालतू पोरगा आहे. सडकछाप एकदम. आणि हि इतकी हुशार आणि सुंदर. कसे काय याच्याबरोबर फिरते? शेवटी व्हायचे तेच झाले. त्याने तिला ज्यासाठी मैत्री केली होती ते करायचे ते केले आणि आता गेलाय म्हणे निघून. सापडली दुसरी कोणी एक त्याला. आणि हि इकडे गेली आहे आता डिप्रेशन मध्ये. कित्येक दिवस ऑफिसला पण येत नाही. ह्या सायकोलॉजीस्टला भेट त्याचा सल्ला घे सुरु आहे म्हणे.
शिंपल्या बागा मनाच्या तूच साऱ्या
लावल्या आशा क्षणाच्या तूच साऱ्या
**
आयुष्याला दान केले मैफिलीला
छेडल्या तारा सुखाच्या तूच साऱ्या
**
आदिमाया तू जगाची सर्वसाक्षी
पेटवीले या नभाला तूच साऱ्या
**
मी सुखाने पाहता हे शेत माझे
गारपीटे झोपवीले तूचसाऱ्या
**
चालताना आडवाटा आयुष्याच्या
सोड चींता तू मनाच्या तूच साऱ्या
**
जो मुलीचा बाप होतो भाग्यवाना
भ्रूणहत्या थांबवा रे तूच साऱ्या
**
शोभली ती माय राजा शिवबाची
शोभली ती मॉं जनाची तूच साऱ्या
**
प्रकाश साळवी