सोरायसिस वर उपचार
माझ्या एक परिचितांना (वय : ६१ वर्षे) सोरायसिस चा फार त्रास सुरु आहे गेली अनेक वर्षे. इतके दिवस सहन होत होतं तोवर काही क्रीम्स वापरत होते. पण आत्ता त्रास फार वाढलाय आणि त्यावर पायाचे दुखणे पण फार वाढलं आहे. शिवाय मधुमेहाचा त्रास आहेच.
संपूर्ण उपचार घेतल्याशिवाय आत्ता पर्याय नाही आणि त्यासाठी पुण्यातील डॉक्टर/वैद्य यांचा संदर्भ मिळेल काय. 'फॅमिली डॉक्टर' मध्ये "श्री सिद्धिविनायक आयुर्वेद फाउंडेशन" ची जाहिरात येते कायम याच्या उपचारा संदर्भात. त्यांना संपर्क करणार आहोतच, पण कुणाला अधिक माहिती अथवा अनुभव असेल तर नक्की लिहा इथे.