लहान मुलांचे वजन
Submitted by मी अमि on 26 June, 2015 - 06:16
माझ्या मुलाचे वय पावणे दोन वर्षे आहे आणि वजन ९.८ किलो आहे. इतके दिवस डॉक ना विचारले तेव्हा ते त्याचे वजन ठिक आहे वगैरे म्हणायचे. दुसर्या डॉक ना दाखवले तेही तसेच म्हणाले होते. यावेळच्या व्हीजीट मध्ये मी डॉक ना परत सांगितले की त्याचे वजन बरेच दिवसांपासून स्थिर आहे. तेव्हा ते म्हणाले की त्याचे वजन १ वर्षे ते २ वर्ष या काळात १.५ किलो वाढायला हवे होते. सध्या ते फक्त ६०० ग्रॅम वाढलय.
त्याचा आहार असा आहे: - सकाळि ७.३० ते ८ - नाचणी सत्व (दुध घालून)
सकाळी ११ ते १२ - पोळी भाजी, भात, अंड्याची बुर्जी/ ऑम्लेट, वरण/ ताक
दुपारी ३ ते ४ - रव्याची खीर/ गव्हाच्या पीठाची खीर/ फळांचा मिल्क शेक
शब्दखुणा: