सोरायसिस वर उपचार

Submitted by रंगासेठ on 26 October, 2015 - 05:53

माझ्या एक परिचितांना (वय : ६१ वर्षे) सोरायसिस चा फार त्रास सुरु आहे गेली अनेक वर्षे. इतके दिवस सहन होत होतं तोवर काही क्रीम्स वापरत होते. पण आत्ता त्रास फार वाढलाय आणि त्यावर पायाचे दुखणे पण फार वाढलं आहे. शिवाय मधुमेहाचा त्रास आहेच.

संपूर्ण उपचार घेतल्याशिवाय आत्ता पर्याय नाही आणि त्यासाठी पुण्यातील डॉक्टर/वैद्य यांचा संदर्भ मिळेल काय. 'फॅमिली डॉक्टर' मध्ये "श्री सिद्धिविनायक आयुर्वेद फाउंडेशन" ची जाहिरात येते कायम याच्या उपचारा संदर्भात. त्यांना संपर्क करणार आहोतच, पण कुणाला अधिक माहिती अथवा अनुभव असेल तर नक्की लिहा इथे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डेक्कन वर डॉ.अत्रे. होते पूर्वी. आता क्लिनीक आहे का चेक करावे लागेल. जास्त आग होत असेल तर elovera याच नावाचे aloevera चे क्रीम मिळते ते लावू शकता. तेलाने मसाज केला तरीही उपयोग होतो.

धन्यवाद आशूडी. मी सांगतो तसे त्यांना.
आयुर्वेदिक पंचकर्माने फरक पडेल असं काही ठिकाणी वाचलय. बराचसा त्रास कमी होतो म्हणून.

रन्गासेठ, पुण्यात सातारा रोडवर ( बहुतेक महर्षीनगर किन्वमुकुन्दनगर्म, बिबवेवाडी साईडला) डॉ. दिलीप गाडगीळ म्हणून आयुर्वेदीक तज्ञ आहेत. त्यान्चे उपचार योग्य असतात असे ऐकले आहे. नीट पत्ता माहीत नाही.

माझ्या ओळखीतल्या एकाचा खुप years जुना सोरायसिस बरा झाला आहे. डॉक्टर आहेत Dr Zahir Mohammad Khergamwala ते शनिवार रवीवार मुम्बईला पन येतात. he is from Valsad Vapi Gujarat. You can google it.

मी डॉक्टर नाही . परंतू माझ्या मते सोरायसिस हा त्रास गंभीर काळजीमुळे होतो. मला स्वतःला अतिशय खाज सुटत असे. मी अशी काही वर्ष काडली. ज्यावेळी माझ्या काही समस्या नाहिश्या झाल्या किंवा मी त्या केल्या तेव्हा खाज थांबली, या प्रकारात खाज एवढी येते की लोकांमधे मिसळणे लाजिरवाणे होते. त्यावेळी मी कामावर होतो. तसेच एखाद्या वागणुकीच्या पॅटर्न मुळे ही हा त्रास होऊ शकतो . शक्य झाल्यास मानसोपचार तज्ञाला विचारावे. नाहीतर शक्य असल्यास असा पॅटर्न ( मराठी शब्द माहित नाही ) स्वतः शोधून काढावा. त्यात योग्य बदल केल्यास या त्रासातून सुटका होते. अर्थात यावर बरेच आक्षेप येऊ शकतात. शक्यतोवर आहे ती परिस्थिती समजून घेऊन स्वीकारावी व आपल्या समस्यांची जबाबदारी स्वतःकडे घ्यावी. दुसर्‍याला जबाबदार धरू नये. अर्थात या सगळया माझ्या समजुती आहेत.

hello uno,
te doctor mumbai madhe kontya hospital madhe yetat ani tyancha timing tumhi sangu shakal ka?
mla dekhil 9 varshapasun psoriasis ahe ani mi ayurvedic upchar ghet asun mla phije tevdha farak pdla nhiye

तुम्ही गूगलवर बघु शकता. माला फक्त वापी आणी वल्साड चे timing mahit aahet. मी लिन्क देते http://www.justdial.com/Valsad/Dr-Zahir-Mohammad-Khergamwala-%3Cnear%3E-...

His phone no only works during his clinic timings. He is MD. gives very one tube ointment and tables only twice a week. no steroids at all.