Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on 23 November, 2014 - 11:03
नमस्कार मंडळी, मायबोलीवरच्या थोरामोठ्यांच्या गझला नावाच्या रचना वाचून पहिली वाहिली रचना गद्य , पद्य का गझल कै माहिती नाही, सुचलं ते लिहिलं. दुरुस्त्या सुचवाव्यात.
वाटेल तेवढा त्रास दे,
पण मला भारी किस* दे.
तुला रागावतो कितीही मी
गालावर फिरवते ते मोरपीस दे,
गझल पाडतो चिडू नको
खर्च करायला पोरांची फीस दे,
आयुष्यात चांगल्या खुप आल्या
पण रक्त आटवायला एक खवीस दे,
विठ्ठला, मागत नाही त्रासाशिवाय
पण जाता जाता भारी किस दे.,
टीप : * किस = खोबर्याचा किस जो सर्वांना हवाहवासा वाटतो.
त्यात साखर घातली की तो प्रसाद होतो हा त्या शब्दाचा अर्थ.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान! शब्दखुणा अधिक आवडल्या.
छान!
शब्दखुणा अधिक आवडल्या. आयुर्वेद, काव्यलेखन, होमिओपथी, गझल!
हाहाहा! प्रा.डॉ. हे गझल,
हाहाहा! प्रा.डॉ. हे गझल, कविता, काही असो, मजेशीर आहे नक्की!
व्वा व्वा ! आपली दाद मिळाली
व्वा व्वा ! आपली दाद मिळाली मी धन्य झालो. लोक ज्यांच्या रचना वाचुन ज्यांना म्हणे standing oviation
देतात त्याचे बोल आमच्या रचनेला लागले माझं काव्यक्षेत्रात भवितव्य उज्वल आहे असं समजू का ?
-दिलीप बिरुटे
ज्योती म्याम, ही गझल वाटली हे
ज्योती म्याम, ही गझल वाटली हे वाचुन आनंद वाटला. आपण रसिकांनी अशीच दाद दिली, प्रोत्साहन दिले तर
मी अजुन खुप चांगलं नक्की लिहिन. धन्स.
-दिलीप बिरुटे
बिरुटे, तुम्ही वैद्यकीय
बिरुटे,
तुम्ही वैद्यकीय डॉक्टर आहात की पी एच डी?
गझ लेचा किस खुसखुशीत !
गझ लेचा किस खुसखुशीत !
प्रा. डाॅ.,तुमच्या पहिल्या
प्रा. डाॅ.,तुमच्या पहिल्या प्रयत्नाला माझ्या पहिल्या प्रयत्नाची फोडणी!
वाटेल तेवढा डोक्याला किस दे
पण एक काॅल मिस दे,
खिशात नाही एकही दमडा
रुपये जरा वीस दे
माझ्या रचनेवरुन चक्क कविता
माझ्या रचनेवरुन चक्क कविता स्फुरु लागल्यात. व्वा अतिशय छान.
आता त्या लेखनाला गझलेची चौकट घाला म्हणजे ती गझल होईल
दिलीप बिरुटे
माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच
माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच फालतू गझलकार निघालात राव , छ्छ्या !!
अरे बाळा वैवकु आपल्या रचना
अरे बाळा वैवकु आपल्या रचना याच आमच्या प्रेरणा तेव्हा रचनेवर बोला गझलकाराला कशाला फ़ालतू म्हणता नै का ? आम्ही आपल्या रचनेला त्या कितीही फालतू असल्या तरी आजपर्यंत जाहीर मी फालतू म्हटलेलं नाही,
आपलं भांडन हलवायाशी त्याच्या जिलेबिशी थोड़ी नै का ? सांगा न आमच्या जिलेबीत काय हवं काय नको !
-दिलीप बिरुटे
(हलवाई)
छान!
छान!
प्रा.डॉ.दिलीप बिरूटे, हा आपला
प्रा.डॉ.दिलीप बिरूटे,
हा आपला प्रयत्न खरोखरच पहिलाच असेल तर नक्कीच अप्रतिम. यापुढे आपल्याकडून याहीपेक्षा सुंदर कवितांची अपेक्षा आहे.
अभिनंदन.
बीॠटे साब रूठो मत यार मै
बीॠटे साब रूठो मत यार मै तुमकु फालतू बोल्या तुम्हारी गझलकू नै नीट आठवो मै क्या बोला गझलकार फालतू़ हो बोलके के ! और तुम्हारी ये "किस'कट रचना कविता म्हणणेके लायकी की भी नै है इसकू गझल बोलनाइच गझल का अपमान है बाबा
जान्दो तुम्हारेकू नै समझेंगा
बाळा वैवकू आता आपण म्हणता
बाळा वैवकू आता आपण म्हणता तेव्हा मी फालतू असेनच. मुळ विषयावर आपल्याला लिहायची सवय नाही. 'वाटेल तेवढा डिंक (गम) घे, पण देवा गझलेला चिकटणारे शब्द दे' ही देवाला
मागणी केलीच आहे.
मला सुचलं ते आपल्याला आवडलं नाही, आपल्या मताचा मी आदर करतो. वर केलेली
रचना ही गझल नसेल नसू दे, मला त्यासाठी 'आर्ता' 'तन्यता' अशा अर्थ नसलेल्या शब्दांचा शोध
लावून मला माझ्या डोक्यावरचे केस घालवायचे नाही आणि'टकलू' म्हणून घेण्यात मला आनन्द नाही.
आपल्या जिलेबीसारखीच आमची जिलेबी वाईट झाली वाटतं. तरी मी विठ्ठल बिठ्ठल रचनेत टाकलं होतं
-दिलीप बिरुटे
मुख्यपृष्ठ:ग्रूप:मोबाईलचे
मुख्यपृष्ठ:ग्रूप:मोबाईलचे तंत्र आणि मंत्र ??
प्लीज हे गझल किंवा तत्सम योग्य विभागात हलवणार का?
मुळात कल्पना आवडली. मग ती
मुळात कल्पना आवडली. मग ती वृत्तात आहे की नाही इत्यादी विचार फजूल !!